2000 Note News: नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा ID Card ची गरज नाही

RBI: मंगळवार, 23 मे पासून बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा बदलणे आणि जमा करणे सुरू होणार आहे. नोट बदलण्यासाठी आरबीआयने बँकांना रोख ठेव नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. दरम्यान सोशल मिडियावर नोटा बदलण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल अशी बातमी पसरत आहे. परंतु एसबीआयने स्पष्ट केले आहे की नोट बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्म किंवा ओपलखपत्राची गरज लागणार नाही.

Updated May 21, 2023 | 04:12 PM IST

No Form or ID Card will have to be filled to exchange 2000 notes

2000 च्या नोटा बदलण्यासाठी आणि जमा करण्यासाठी नियम व अटी जाणून घ्या

फोटो साभार : ANI
थोडं पण कामाचं
  • 23 मे पासून 2000 रुपयांची नोट बँकेत जाऊन बदलता येणार.
  • एका दिवसात 20 हजारांपर्यंत बदलू शकतील
  • नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरावी लागणार नाही
2000 Note Exchange: आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनंतर बँकांकडून नोटा बदलण्यासंबंधी परिपत्रक जारी केले जात आहे. 2016 प्रमाणे यंदाही नोटा बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकांबाहेर गर्दी होणार नाही, याची काळजी घेत, येत्या 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचे तसेच जमा करण्याचे काम बँकेमध्ये सुरू होणार आहे. तसेच एसबीआयने स्पष्ट केलेल्या गाईडलाईन नुसार दिवसाला 20,000 रुपयांपर्यंतची देवाणघेवाण करता येणार असून, त्यासाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकेत जावे लागणार आहे. नोट बदलण्यासाठी आरबीआयने बँकांना रोख ठेव नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
दरम्यान लोकांना 2000 रुपयाची नोट बदलण्यासंबंधात अनेक प्रश्न पडले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ-

कोणता फॉर्म भरावा लागेल का?

आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रोख ठेव नियमाचे पालन करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नोटा बदलण्यासाठी आरबीआयने असा कोणताही फॉर्म जारी केलेला नाही. तसेच बँकांना आरबीआयकडून अशा कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत, ज्यामध्ये लोकांना नोटा बदलण्यापूर्वी कोणताही फॉर्म किंवा कोणतीही स्लिप भरावी लागेल किंवा त्यांचे कोणतेही ओळखपत्र द्यावे लागेल.

ओळखपत्र पुरावा द्यावा लागेल का?

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांना कोणतेही ओळखपत्र द्यावे लागणार नाही. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक बातम्या प्रदर्शित होत असून, अद्याप आरबीआयकडून अशी कोणतीही सूचना बँकांना देण्यात आलेली नाही. तसेच, दोन हजार रुपयांच्या नोटा खूप कमी लोकांकडे असल्याचे बँकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बँकेबाहेर जास्त गर्दी जमा होणार नाही आणि नोटा सहज बदलून जमा करू शकतील अशी आशा बँकाना आहे. त्यामुळे. 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी तुम्हाला कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागणार नाही, असे एसबीआयने परिपत्रक जारी केले आहे. बँकेत जाऊन तुम्ही सहज नोटा जमा करू शकाल.

2000 ची नोट कशी बदलावी?

तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन सहज नोटा बदलू शकता. ज्या बँकेत तूमचे खाते आहे त्या बँकेच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करू शकता. २० हजारांपर्यंत कोणतीही स्लिप किंवा फॉर्म भरण्याची गरज नसून त्यासाठी ID card दाखवायची आवश्यकता नाही. KYC नियमांनुसार नोटा सहजपणे बदलल्या जातील.

नोट बदलण्याच्या नियम व अटी काय आहेत?

RBI ने एका दिवसात 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलण्याची परवानगी दिली आहे. तसेच पैसे बँक खात्यात जमा करण्याची काही मर्यादा नाही. मात्र, परंतु बँकिंग नियमांचे पालन करावे लागेल. एका दिवसात 20000 रुपये बदलता येणे शक्य आहे.

नोट कधीपर्यंत बदलता येईल?

2000 ची नोट बदलण्याची अवधि 23 मे ते 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. यानंतरही तुम्ही नोट बदलू शकता, म्हणजेच ३० सप्टेंबरची मुदत चुकली तर तुम्हाला आरबीआय कार्यालयात जाऊन नोट बदलून घ्यावी लागेल.

ज्यांचे खाते नाही त्यांनी काय करावे?

आरबीआयने स्पष्ट केले आहे की ज्यांचे बँक खाते नाही ते देखील त्यांच्या जवळच्या शाखेत जाऊन 20,000 रुपयांच्या नोटा सहज मिळवू शकतात. 2000 नोटाच्या बदल्यात समतुल्य लहान नोटा बदलून मिळतील.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited