धक्कादायक ! मुलींच्या स्कर्टच्या खिशात हात टाकून अश्लिल चाळे करायचा शिक्षक आणि...

या प्रकरणी आरोपी शिक्षकाच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्या विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Updated May 17, 2023 | 09:28 PM IST

धक्कादायक ! मुलींच्या स्कर्टच्या खिशात हात टाकून अश्लिल चाळे करायचा शिक्षक आणि...
Crime News Marathi: शिक्षक हे गुरू मानले जातात. मुलांना शिकवण्यापासून ते त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. मात्र, आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन मुलीसमोर अश्लिल चाळे केले आणि छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथील आहे. शाळेतील विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी संबंधित आरोपी शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाच्या विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थीनींसोबत अश्लिल चाळे केल्यावर तो रिवॉल्वरच्या सहाय्याने त्यांना घाबरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थीनी इतक्या भयभीत झाल्या होत्या की त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर संतप्त पालकांनी शाळेलाच टाळे ठोकले. सात दिवस शाळा बंद ठेवण्यात आली. आरोपी शिक्षकाचे नाव आशुतोष शर्मा असे आहे. आरोपी शिक्षकावर आरोप आहे की तो, शाळेतील विद्यार्थीनींची तपासणी करण्याच्या नावावर त्यांच्या खिशात हात टाकत असेल. तसेच त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करत असे.
बाल हक्क संरक्षण कार्यकर्ते नरेश पारस यांनी या प्रकरणात पुढाकार घेत संपूर्ण माहिती बाल आयोगाला दिली. नरेश पारस यांनी सांगितले की, बुधवारी पोलिसांनी गावात पोहोचून सर्व विद्यार्थीनींचे जबाब नोंदवले. जोपर्यंत आरोपी शिक्षक तुरुंगात जात नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही असंही मुलींने सांगितले.
नरेश पारस यांनी सांगितले की, कायद्यानुसार पोलीस गणवेश नसलेल्या मुलांची चौकशी करू शकतात. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करता येणार नाही. या मुलींच्या पालकांच्या मते, त्यांना मुलींना घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी अलोक कुमार यांनी सांगितले की, मुलांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. सर्व मुलींचे जबाब हे महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत नोंदवण्यात आले आहेत.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited