UPSC 2022 Final Result OUT: यूपीएससीच्या परीक्षेत ठाण्याच्या काश्मिराने मारली बाजी, पाहा उत्तीर्ण उमेदवारांची यादी

UPSC 2022 Final Result OUT: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (23 मे) जाहीर झाला. ठाण्याच्या काश्मिरा संख्ये ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे या निकालात मुलींनी छाप सोडली आहे. पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत.

Updated May 23, 2023 | 04:42 PM IST

UPSC 2022 Final Result OUT, upsc Topper 2022 Rank, upsc Result 2022 Topper list

UPSC 2022 Final Result OUT, upsc Topper 2022 Rank, upsc Result 2022 Topper list

UPSC final Result 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Exam 2022 Results) अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. परीक्षेत ठाण्याची काश्मिरा संख्ये ही राज्यात पहिली आली असून देशात ती 25 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या निकालात मुलींनीच माजी मारली आहे. पहिल्या तीन क्रमांकावर क्रमश: इशिता किशोर, गरिमा लोहिया आणि उमा हरथी या मुली झळकल्या आहेत. तर राज्यात पहिली आली आहे. उमेदवार आपला निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ www.upsc.gov.in यावर पाहू शकतात.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC Exam 2022 अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत एकूण 933 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात 345 (खुला गट), 99 (ईडब्ल्यूएस), 263 (ओबीसी) , 154 (एससी), 72 (एसटी) वर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. 178 विद्यार्थ्यांची आरक्षित सूची तयार करण्यात आली आहे. IAS पदासाठी 180 विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

कधी झाला होता इंटरव्ह्यू?

यूपीएससीतर्फे 24 एप्रिल ते 18 मे दरम्यान विद्यार्थ्यांचे तीन टप्प्यात इंटरव्ह्यू घेण्यात आला होता. इंटरव्ह्यूमध्ये निवडण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी युपीएससीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली आहे.

टॉपर्स उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे... (UPSC Result 2022 Topper list)

1. 5809986 - इशिता किशोर
2. 1506175 - गरिमा लोहिया
3. 1019872- उमा हरथी एन
4. 0858695- स्मृति मिश्रा
5. 0906457- मयूर हजारिका
6. 2409491- गहना नव्य जेम्स
7. 1802522- वसीम अहमद भट
8. 0853004- अनिरुद्ध यादव
9. 3517201 -कनिका गोयल
10. 0205139- राहुल श्रीवास्तव
11. 3407299 -परसंजीत कौर
12. 6302509 -अभिनव सिवाच
13. 2623117 -विदुषी सिंह
14. 6310372 -कृतिका गोयल
15. 6802148- स्वाति शर्मा
16. 6017293 शिशिर कुमार सिंह
17. 0840388 -अविनाश कुमार
18. 0835555- सिद्धार्थ शुक्ला
19. 0886301 -लघिमा तिवारी
20. 7815000 -अनुष्का शर्मा
21. 6911938 -शिवम यादव
22. 5005936 -जी व्ही एस पवनदत्त
23. 0878394 -वैशाली
24. 0860215 -संदीप कुमार
25. 0504073 - कश्मिरा किशोर संख्ये
26. 0400900 -गुंजीता अग्रवाल
27. 0835608 -सूर्यभान अच्छेलाल यादव
28. 3528300 -अंकिता पुवार
29. 0826762 -पौरूष सूद
30. 5409668- प्रेक्षा अग्रवाल
31. 0824362- प्रियंशा गर्ग
32. 5902868- नितिन सिंह
33. 0853450 -थारुण पटनायक मडाला
34. 2634092- अनुभव सिंह
35. 0850467- अजमेरा संकेत कुमार
36. 1913276 -आर्य व्ही एम
37. 2605780 -चैतन्य अवस्थी
38. 0844833 -अनूप दास
39. 5407096 -गरिमा नरूला
40. 8201151 -श्रीसाईं आश्रित शाखमुरी
41. 5800842- शुभम
42. 0802775 -प्रणिता डैश
43. 6401503- अर्चिता गोयल
44. 1521306 -तुषार कुमार
45. 0841168 -नारायणी भाटिया
46. 2636058- मनन अग्रवाल
47. 0888259- गौरी प्रभात
48. 1500993 -आदित्य पाण्डेय
49. 7815739 -संस्कृति सोमानी
50. 7108433- महेंद्र सिंह

कश्मिरा संख्ये राज्यात पहिली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Exam 2022 Results) अंतिम परीक्षेचा निकालात महाराष्ट्रातील ठाणे येथील काश्मिरा संख्ये ही चमकली आहे. काश्मिरा संख्ये हिने ही राज्यात पहिली आली आहे तर देशात ती 25 व्या क्रमांकावर आहे. चौथ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कश्मिराचे आई-वडील दोघे सरकारी सेवेत आहेत.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited