Karnataka News : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम, मुस्लिम उपमुख्यमंत्री करण्याची पुढे आली मागणी

Karnataka CM : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 224 पैकी 135 जागा जिंकत काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले. पण निवडणुकीचा निकाल लागून 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला तरी राज्यातला मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. मुख्यमंत्री पदाचा प्रश्न अनुत्तरीत असतानाच उपमुख्यमंत्री या पदावरून नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. निवडक आमदार कर्नाटकमध्ये यावेळी मुस्लिम उपमुख्यमंत्री करावा अशी मागणी काँग्रेसकडे करत आहेत.

Updated May 15, 2023 | 08:45 AM IST

Siddaramaiah or DK Shivakumar

Siddaramaiah or DK Shivakumar

Karnataka CM : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 224 पैकी 135 जागा जिंकत काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले. पण निवडणुकीचा निकाल लागून 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला तरी राज्यातला मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. डीके शिवकुमार आणि सिद्धारमैय्या या दोन पर्यायांचा मुख्यमंत्री पदासाठी प्राधान्याने विचार सुरू आहे. पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री पदाचा प्रश्न अनुत्तरीत असतानाच उपमुख्यमंत्री या पदावरून नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर काँग्रेसने सिद्धारमैय्या यांनाच मुख्यमंत्री केले होते. पण काँग्रेसच्या अनेक आमदारांनी सत्ता स्थापनेला काही महिने झाल्यानंतर राजीनामा देत भाजपची वाट धरली. यामुळे सिद्धारमैय्या यांचे सरकार अडचणीत आले होते. हा इतिहास एकीकडे आहे तर दुसरीकडे सिद्धारमैय्या यांना काँग्रेसचे कर्नाटकमधील दलित समाजाचे मोठे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते.
डीके शिवकुमार हे काँग्रेसचे श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे पक्षाच्या एका मोठ्या गटाचा आजही भक्कम पाठिंबा असल्याची चर्चा आहे. तसेच ते गांधी परिवाराचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत शिवकुमार यांच्यामुळे काँग्रेसला प्रचाराचा धुरळा उडवून देणे सोपे झाले अशीही चर्चा आहे. यामुळेच शिवकुमार यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत आहे.
कर्नाटकमधील मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सुटण्याआधीच राज्यात उपमुख्यमंत्री या पदावरून नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. काही आमदारांनी दोन किंवा तीन उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. निवडक आमदार कर्नाटकमध्ये यावेळी मुस्लिम उपमुख्यमंत्री करावा अशी मागणी काँग्रेसकडे करत आहेत. सुन्नी उलमा बोर्डाच्या नेत्यांनीही काँग्रेसकडे मुस्लिम उपमुख्यमंत्री करावा अशी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारच्या कॅबिनेटमध्ये किमान पाच मुस्लिम कॅबिनेट मंत्री असावेत अशीही मागणी सुन्नी उलमा बोर्डाच्या नेत्यांनी केली आहे. अद्याप या मुद्यांवर काँग्रेस नेतृत्वाने निर्णय घेतलेला नाही.
मुस्लिम मतांमुळे काँग्रेसला 72 मतदारसंघांमध्ये मोठा फायदा झाला. कर्नाटकमध्ये काँग्रेसने 15 मुस्लिम उमेदवार दिले होते. यापैकी 9 निवडून आले आहेत. मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. या सगळ्याचा विचार करून मुस्लिम आमदारांना काँग्रेसने कर्नाटकमध्ये गृह, महसूल, आरोग्य अशा महत्त्वाच्या पदांवर कॅबिनेट मंत्री करावे अशी मागणी वक्फ बोर्ड आणि सुन्नी उलमा बोर्डाच्या नेत्यांकडून पुढे आली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2023

  1. एकूण जागा 224
  2. काँग्रेस 135
  3. भाजप 66
  4. जनता दल सेक्युलर 19
  5. अपक्ष 2
  6. कल्याण राज्य प्रगती पक्ष 1
  7. सर्वोदय कर्नाटक पक्ष 1
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited