ट्रेंडिंग:

Egg Face Pack: ब्लॅकहेड्स आणि चेहऱ्यावरील घाण दूर करण्यासाठी वापरा अंड्याचा फेस पॅक

Egg Face Pack Benefits​: अंड्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की अंडे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. अंड्यांचा वापर करून त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अंडी सीबम कंट्रोल करण्यास मदत करतात ज्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल येत नाही.

Updated May 26, 2023 | 07:14 AM IST

Egg Face Pack.

Egg face pack for remove blackheads and dirt from face

फोटो साभार : BCCL
Egg Face Pack Benefits: अंड्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की अंडे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. अंड्यांचा वापर करून त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अंडी सीबम कंट्रोल करण्यास मदत करतात ज्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल येत नाही. (Egg face pack for remove blackheads and dirt from face)
त्यांचा वापर केल्याने अँटी एजिंगच्या समस्येपासूनही सुटका मिळते. यासोबतच ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी अंडे खूप प्रभावी मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अंड्याचा फेस पॅक वापरून ब्लॅकहेड्स आणि चेहऱ्यावरील घाण कशी साफ करावी ते सांगणार आहोत.

अंडी आणि काकडीचा फेस पॅक

संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी हा फेस पॅक खूप फायदेशीर मानला जातो. हा फेस मास्क बनवण्यासाठी एक अंड्याचा पांढरा भाग, एक चमचा मध, एक चमचा काकडीचा रस आणि एक चमचा दही मिक्स करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा. या फेसपॅकचा वापर केल्याने त्वचेला चमक येईल आणि त्वचेला थंडावाही मिळेल.

अंडी आणि लिंबाचा फेस पॅक
त्वचेवरील टॅन, डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी अंडी आणि लिंबू फेस पॅक वापरा. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक अंड्याचा पांढरा भाग, अर्धा चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.

ब्लॅकहेड्ससाठी अंड्याचा मास्क

ब्लॅकहेड्सच्या समस्येवर मात करण्यासाठी अंड्यातील पांढऱ्या भागाचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी अंड्याचा पांढरा भाग घ्या. आता टिश्यू पेपरच्या छोट्या पट्ट्या करा. या पट्ट्या अंड्यामध्ये बुडवा आणि ब्लॅकहेड्स असलेल्या भागांवर लावा. आता या पट्ट्या सुकल्यानंतर काढून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क वापरा.

ताज्या बातम्या

वडिलांप्रमाणेच ओमराजे निंबाळकर यांच्या हत्येचा प्रयत्न? अंगावर डंपर येत असल्याचं पाहून रोडखाली उडी मारल्याने बचावले

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी वारीला सुरुवात, जाणून घ्या वारी म्हणजे काय आणि वारीचे महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023

Daily Horoscope 10 June: आजचे राशीभविष्य; वाचा हा शनिवार तुमच्यासाठी कसा असणार

Daily Horoscope 10 June

Vastu Tips: तुमच्या घरातील तुळस वारंवार सुकते? मग व्हा सावध अन् तात्काळ करा 'हे' उपाय

Vastu Tips

Sharad Pawar : जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'धमक्या देऊन....'

Sharad Pawar

Ashadhi Wari 2023 Timetable: आषाढी वारी कधी? जाणून घ्या तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचे संपूर्ण वेळापत्रक

Ashadhi Wari 2023 Timetable

Sharad Pawar News Today : शरद पवारांना धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता? जाणून घ्या सौरभ पिंपळकर आहे तरी कोण?

Sharad Pawar News Today

Sharad Pawar Death Threat: मोठी बातमी! तुमचा लवकरच दाभोलकर होणार, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Sharad Pawar Death Threat
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited