Sleeping Position: झोपण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या आयुष्यातील सीक्रेट, तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये झोपता?

Vastu Shastra : प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि याच पद्धतीने झोपणे त्यांना पसंत असते. मात्र, तुमच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे तुमच्याबद्दलचे अनेक सीक्रेट्स उघड होतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Updated May 25, 2023 | 03:39 PM IST

Sleeping Position: झोपण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या आयुष्यातील सीक्रेट, तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये झोपता?
Sleeping Position tells secrets about you: आपली झोपण्याची पद्धत आणि आपले व्यक्तिमत्व याचा एक खास संबंध असतो. आपण गाढ झोपेत असतो तेव्हा नैसर्गिकरित्या एका पोझिशनमध्ये झोपतो. आपण विचार करुन अशा प्रकारे झोपू शकत नाही. तुमच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे तुमच्याबद्दलचे अनेक सीक्रेट्स उघड होतात. जाणून घ्या याबाबत अधिक माहिती....

एकाच पोझिशनमध्ये झोपणे

एखादा व्यक्ती एका कुशीवर झोपत असले आणि हात-पाय सरळ ठेवत असेल तर त्या व्यक्तीचा सामाजिक प्रभाव चांगला असल्याचं दर्शवते. तसेच हा व्यक्ती खूपच मजेत आपलं आयुष्य जगतो. या व्यक्तींवर अगदी सहज कुणीही विश्वास ठेवतं. पण अनेकदा या व्यक्तींच्या स्वभावाचा काहीजण गैरफायदा सुद्धा घेतात.

हात लांब करून झोपणे

जे व्यक्ती हात पसरून झोपतात ते खूप मोकळ्या मनाचे असतात. हे व्यक्ती कधीकधी संशयास्पद वागू लागतात. या व्यक्तींची खास बाब म्हणजे काही करायचे ठरवले तर ते काम पूर्ण करतातच.

सोल्जर पोझिशन

जे व्यक्ती पाठीवर आणि सरळ हात-पाय ठेवून झोपतात ते खूप व्यवस्थित असतात. या झोपण्याच्या स्थितीला सोल्जर पोझिशन म्हणतात. हे व्यक्ती स्वत:ला आणि इतरांना खूप गंभीरपणे घेतात. ते खूप काही साध्य करण्याच्या स्वत:कडून अपेक्षा सुद्धा ठेवतात.

पोटावर झोपणे

जे व्यक्ती पोटावर झोपतात असे व्यक्ती खूप आनंदी, मोकळ्या मनाचे असतात. या लोकांना त्यांचे आयुष्य खूप आवडते आणि ते आपली लाईफ खूप मजेत जगतात. खूप कमी लोक या पोझिशनमध्ये झोपतात.

एकनिष्ठ असणारे कोणत्या पोझिशनमध्ये झोपतात?

जर तुम्ही पाठीवर झोपतात आणि तुमचे पाय अलगद पसरून डोक्याला हात लावून झोपत असाल तर तुम्ही खूप निष्ठावान व्यक्ती असल्याचं दर्शवते. तुम्ही आपल्या आयुष्यात मैत्रीला महत्त्व देता. हे व्यक्ती इतरांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकतात.

कोणत्या पोझिशनमध्ये झोपणारे व्यक्ती निश्चिंत असतात

जे लोक आपले दोन्ही हात डोक्याच्या मागे उशीप्रमाणे ठेवतात ते व्यक्ती खूप निश्चिंत असतात. हे व्यक्ती कुणाबाबतही वाईट विचार करत नाही. हे खूप भावनिक असतात. जर झोपताना तुम्ही उशीला मिठी मारून झोपत असाल तर त्याचा अर्त तुम्ही प्रेमळ आहात असे लोक नाते-संबंध चांगले जोपासतात.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. या लेखात दिलेल्या माहितीची सत्यता किंवा विश्वासार्हता हमी टाइम्स नाऊ मराठी देत नाही.)
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited