What is Weekend Marriage : लग्नानंतरही सिंगल लाईफ एंजॉय करायची असेल तर जपानचा हा लोकप्रिय मॅरेज ट्रेंड समजून घ्या

What is Weekend Marriage :लग्न करूनही एकल जीवन जगण्याची संधी मिळाली तर ती जाऊ देणार का? अशीच एक संकल्पना सध्या जपानमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. इथे लग्नाचा एक नवीन ट्रेंड आला आहे, ज्यामध्ये लोक लग्न करतात आणि सिंगल लाइफ देखील एन्जॉय करतात. शेवटी हे काय प्रकरण आहे, जे लोकांनाआकर्षित करत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कारण आपल्याला या मनोरंजक ट्रेंडबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

Updated May 31, 2023 | 11:04 AM IST

what are weekend marriage trends who came from japan.

what are weekend marriage trends who came from japan

फोटो साभार : BCCL
What is Weekend Marriage: असे मानले जाते की लग्नानंतर लोक जबाबदाऱ्यांच्या बंधनात बांधले जातात. सामान्य लोकांप्रमाणे स्वतंत्र राहून ते सिंगल लाइफचा आनंद घेऊ शकत नाहीत. यामुळेच जगातील अनेक लोक लग्न करण्याचा निर्णय घेत आहेत अविवाहित राहणे पसंत करत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. लग्न करूनही एकल जीवन जगण्याची संधी मिळाली तर ती जाऊ देणार का? तुमचे उतत्र नक्कीच हो असेल. अशीच एक संकल्पना सध्या जपानमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. इथे लग्नाचा एक नवीन ट्रेंड आला आहे, ज्यामध्ये लोक लग्न करतात आणि सिंगल लाइफ देखील एन्जॉय करतात. शेवटी हे काय प्रकरण आहे, जे लोकांना आकर्षित करत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कारण आपल्याला या मनोरंजक ट्रेंडबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

कमिटमेंट्स पूर्ण होते

वीकेंड मॅरेजमध्ये, विवाहित जोडपे फक्त वीकेंडला एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात आणि त्यांच्या कमिटमेंट्स पूर्ण करतात. उरलेल्या आठवड्यात, स्वतःच्या अटींवर जीवन जगतात. याद्वारे जोडप्यांना लग्नानंतरही एकल जीवन जगण्याचा आनंद घेता येईल. ज्या जोडप्यांची आवड आणि जीवनशैली वेगळी आहे त्यांच्यासाठी ही पद्धत उत्कृष्ट ठरत आहे. आठवडाभर ते त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगतात आणि वीकेंडला एकमेकांच्या आवडीनिवडी जपतात. ही संकल्पना स्वीकारल्यानंतर कपल्सना एकमेकांच्या जीवनशैलीची काळजी घ्यायची गरज वाटत नाही.

भांडणं कमी, दर्जेदार वेळ

वीकेंड मॅरेज करणारी जोडपी एकमेकांसोबत कमी वेळ घालवतात. त्यामुळे भांडणाची शक्यताही कमी होते. जेव्हा जोडपे पूर्ण आठवड्यानंतर भेटतात तेव्हा ते दोन दिवस खूप रोमँटिक मूडमध्ये असतात. नेहमी सोबत राहणाऱ्या कपल्सना एकमेकांशी बोलायला फारसे काही विषय सुचत नसते. मात्र आठवडाभरानंतर जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्याकडे एकमेकांना सांगण्यासारखे खूप काही असते. ते त्यांच्या आयुष्यातील सुख- दु:खाच्या, ऑफिसच्या किंवा इतर मजेदार आणि आव्हानात्मक गोष्टी शेअर करू शकतात. अशा प्रकारे ते एकत्र चांगला वेळ घालवू शकतात. सध्या जोडीदाराशी जवळीक साधण्याचा हा एक उत्तम मार्ग असल्याचे सिद्ध होत आहे.

बाँडिंग मजबूत होते

जेव्हा विवाहित जोडपे वीकेंड मॅरेजची पद्धत अवलंबतात, तेव्हा ते अधिक दर्जेदार वेळ घालवण्यास सक्षम असतात, कारण दोन्ही लोक उर्जेने परिपूर्ण असतात. आठवड्याच्या शेवटी कामाचे किंवा इतर जबाबदाऱ्यांचे ओझे कमी असते आणि व्यस्त असण्याची शक्यताही कमी असते. असे मानले जाते की दोन दिवसात कपलमध्ये चांगली बॉंडिंग होते जी 7 दिवस एकत्र राहूनही शक्य होत नाही. आठवड्याच्या शेवटी ते एकमेकांशी मनापासून कनेक्ट होतात आणि आहे त्या वर्तमान क्षणांचा आनंद घेतात. या विकेंड मॅरेजमुळे, लोकांना प्रायव्हसी, स्पेस मिळते आणि ते त्यांचे सर्व काम अधिक चांगल्या पद्धतीने करून सुंदर आयुष्य जगू शकतात.
ताज्या बातम्या
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited