5 year old Sagar dies : बोअरवेलमध्ये पडून 5 वर्षांच्या सागरचा मृत्यू, आठ तासांची झुंज अपयशी

नगर
रोहन जुवेकर
Updated Mar 14, 2023 | 09:16 IST

5 year old Sagar dies after falling into borewell, eight hour struggle fail : महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे धक्कादायक घटना घडली.

5 year old Sagar dies after falling into borewell, eight hour struggle fail
बोअरवेलमध्ये पडून 5 वर्षांच्या सागरचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बोअरवेलमध्ये पडून 5 वर्षांच्या सागरचा मृत्यू
  • आठ तासांची झुंज अपयशी
  • खडक फोडून बोअरवेलचा खड्डा मोठा करण्यात वेळ गेला

5 year old Sagar dies after falling into borewell, eight hour struggle fail : महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे धक्कादायक घटना घडली. ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. सागर बुधा बरेला असे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे नाव होते. सागर बोअरवेलमध्ये पडला 15 फूट खाली अडकला. त्याला बोअरवेलमधून बाहेर पडणे अशक्य झाले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मर्यादीत जागेत दीर्घकाळ अडकून पडलेल्या सागरचा अखेर मृत्यू झाला.

बोअरवेलमध्ये 15 फूट खोलवर अडकलेल्या सागरला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. मदतकार्य सुरू झाले. बोअरवेलचा खड्डा आणखी खणून मोठा करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मुलाला खड्ड्यातून बाहेर काढणे सोपे व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. पण 10 फूट खणल्यावर मोठा मजबूत खडक असल्याचे लक्षात आले. खडक फोडून खड्डा मोठा करण्यात खूप वेळ गेला. 

सागर सोमवार 13 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला मंगळवार 14 मार्च 2023 रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बोअरवेलच्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. मुलाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर लगेच डॉक्टरांनी तपासले. तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या उसाच्या शेतात सागरचे पालक काम करत होते. त्यावेळी शेतात खेळत असलेला सागर बोअरवेलमध्ये पडला. सागरचे पालक मूळचे मध्य प्रदेशातील आहे.

सागर बोअरवेलमध्ये पडल्याचे लक्षात आल्यानंतर एनडीआरएफची मदत घेण्यात आली. दोन जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू होते. पण दहा फुटांवर मोठा मजबूत खडक लागला. या खडकाला फोडून खड्डा मोठा करण्यात खूप वेळ गेला. आठ तासांची झुंज अपयशी झाली आणि पाच वर्षांच्या सागरचा मृत्यू झाला.

उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात सत्तू खाण्याचे फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी