नगरमध्येही तोच पॅटर्न; मेळाव्यात ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार नंतर रातोरात शिंदे गटात प्रवेश

नगर
भरत जाधव
Updated Jul 21, 2022 | 12:35 IST

शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहणण्याच्या मागोवा घेतला जातो. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले. राज्यात अनेक नेत्यांच्या बाबतीत असे घडले आहे.

Ahmednagar Shiv Sena  Worker join Shinde Group
मेळाव्यात ठाकरेंना पाठिंबा, नेत्यांची पाठ फिरतातच...   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नगरमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक मान्य नाही
  • पक्षाचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्धार नंतर शिंदे गटात प्रवेश
  • अहमदनगरमधील शिवसेना फुटली

अहमदनगर : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहणण्याच्या मागोवा घेतला जातो. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले. राज्यात अनेक नेत्यांच्या बाबतीत असे घडले आहे. सुरुवातीला आमदारांनीही (MLA) त्याच प्रकारे शिंदे गटात प्रवेश केला. आधी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा आणाभाका घेतला, आणि नंतर बंडखोरी केली. आता खालच्य पातळीतही तेच होत आहे.

मेळाव्यात ठाकरेंना साथ द्यायची आणि नंतर थेट शिंदे गटात प्रवेश करायाचा. तसाच प्रकार नगरमध्ये (Ahmednagar) घडला आहे. 
पक्षाचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र, त्यांची पाठ फिरताच काही पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी रात्रीच मुंबई गाठत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. नगरमध्येही शिवसेना फुटल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनीही शिंदे यांची भेट घेतल्याने तीही चर्चा सुरू झाली आहे.

Read Also : ट्रकच्या धडकेनं गर्भवती महिलेचं फाटलं पोट

दरम्यान एकनाथ शिंदे आणि इतर आमदार आणि मंत्र्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतच्या आघाडीला विरोध करत बंड केलं. तेच ग्रामीण पातळीवरही तिच मागणी जोर पकडत असून अनेक पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत. नगरमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक मान्य नाही. यासंबंधी पूर्वीपासूनच तक्रारी आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही नगर शहरात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वैर कायम होते.

Read Also : Elaichi Benefits For Mens: पुरुषांसाठी वरदान आहे इलायची

आता सरकार गेल्यानंतर आणि शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खदखद व्यक्त करण्यासाठी संधी मिळाली आहे. याच कारणावरून नगरचे माजी आमदार (स्व.) अनिल राठोड यांचे चिरंजीव व युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विक्रम राठोड हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसे संकेत दिल्याचे सांगण्यात येते.

Read Also : कारागृह अधिक्षकाची चूक महिला कैद्यांना पडली भारी

नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे पुत्र नगरसेवक योगीराज गाडे आणि शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे यांचा यामध्ये समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी गाडे आणि नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नगर शहरात नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली होती.

Read Also : कामिका एकादशीच्या दिवशी बनतोय द्विपुष्कर योग

यामध्ये सर्वांनी ठाकरे यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली होती. मात्र अनेकांनी कोरगावकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. २४ पैकी फक्त दहा नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. तरीही सर्वजण आमच्यासोबत असल्याचा दावा कोरगावकर यांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र येतील अनेकांचा ओढा शिंदे गटाकडे असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.तर दुसरीकडे नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने त्याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी