Ahmadnagar hospital Fire : जखमींच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटल मागत आहे पैसे, नातेवाईकांचा आरोप 

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 16, 2021 | 20:13 IST

Ahmadnagar hospital Fire : अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल चक्क पैशे मागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

A private hospital is demanding money for the treatment of the injured relatives allege
जखमीच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटल मागत आहे पैसे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल चक्क पैशे मागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
  • पैशे भरा अन्यथा जखमींना घरी हलवा अशी भूमिका शहरातील एका नामांकित खाजगी हॉस्पिटलने घेतली असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे.
  • अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ६ नोव्हेंबर रोजी कोविड ICU वार्डला शॉर्ट सर्किटने आग लागली होती.

अहमदनगर :  अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल चक्क पैशे मागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पैशे भरा अन्यथा जखमींना घरी हलवा अशी भूमिका शहरातील एका नामांकित खाजगी हॉस्पिटलने घेतली असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. (A private hospital is demanding money for the treatment of the injured relatives allege)

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ६ नोव्हेंबर रोजी कोविड ICU वार्डला शॉर्ट सर्किटने आग लागली होती. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यात जखमी झालेल्या ७ जणांना शहराच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

यामध्ये शहरातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेली यमुनाबाई कांबळे या रुग्णाला उपचारासाठी पैश्यांची मागणी करण्यात आली आहे. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र तेथेच अग्नीतांडव झाल्याने आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

मात्र आता त्या संबधित हॉस्पिटलने पैशे द्या अन्यथा रुग्णाला हालवा अशी भूमिका घेतल्याने आमचा वाली कोण असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी