अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. श्रीगोंदा (Shrigonda) येथून काष्टी (Kashti)येथील मित्राला सोडविण्यासाठी तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ऊसाच्या टेलरला पाठीमागून कारने (Car Accident ) धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. हा अपघात मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत कार मधून प्रवास करणाऱ्या तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेल्यांची नावे राहुल आळेकर (वय 22), केशव सायकर (वय 22), आकाश खेतमाळीस (वय 18), अशी आहेत.
राहुल आळेकर आणि आकाश खेतमाळीस हे श्रीगोंदा येथून काष्टीकडे केशव सायकरला केशव सायकरला जात होते. मध्यरात्री श्रींगोदा काष्टी रस्त्यावरील हॉटेल अनन्या जवळ ऊसाच्या ट्रेलरला धडक दिल्यानं अपघात झाला. ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळतात अनन्या हॉटेलमधील व्यक्तींना घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढले. यावेळी केशव सोयकर आणि आकाश खेतमाळीस या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याच समोर आलं. तातडीनं रुग्णवाहिका बोलावून जखमी राहुल याला श्रीगोंद्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.