गुजरातमध्ये 49 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी नगरमधून 73 वर्षांच्या वृद्धाला अटक

नगर
रोहन जुवेकर
Updated Dec 08, 2022 | 14:04 IST

Accused Arrested In Ahmednagar After 49 Years Handed Over To Gujarat Police : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातून 73 वर्षांच्या सीताराम भाटणे नावाच्या वृद्धाला अटक करण्यात आली. या वृद्धावर गुजरातमध्ये 49 वर्षांपूर्वी एक हत्या करून नंतर फरार झाल्याचा आरोप आहे. 

Accused Arrested In Ahmednagar After 49 Years Handed Over To Gujarat Police
गुजरातमध्ये 49 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी नगरमधून 73 वर्षांच्या वृद्धाला अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गुजरातमध्ये 49 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी नगरमधून 73 वर्षांच्या वृद्धाला अटक
  • वृद्धावर गुजरातमध्ये 49 वर्षांपूर्वी एक हत्या करून नंतर फरार झाल्याचा आरोप
  • गुजरातमधील अहमदाबादच्या सैजपूरमध्ये १९७३ मध्ये घडलेली घटना

Accused Arrested In Ahmednagar After 49 Years Handed Over To Gujarat Police : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातून 73 वर्षांच्या सीताराम भाटणे नावाच्या वृद्धाला अटक करण्यात आली. या वृद्धावर गुजरातमध्ये 49 वर्षांपूर्वी एक हत्या करून नंतर फरार झाल्याचा आरोप आहे. 

गुजरातमधील अहमदाबादच्या सैजपूरमध्ये १९७३ मध्ये सीताराम भाटणे नावाच्या व्यक्तीने मणी शुक्ला (७०) नावाच्या महिलेची हत्या केली होती; अशी माहिती पोलिसांनी दिली.

सीताराम त्याच्या दोन भावांसह मणी शुक्ला यांच्या घरात भाड्यानं राहायचा. सीताराम, महादेव आणि नारायण तळमजल्यावर वास्तव्यास होते. तर शुक्ला वरच्या मजल्यावर राहायच्या. शुक्ला यांच्या हत्येप्रकरणी सीतारामविरोधात १४ सप्टेंबर १९७३ मध्ये सरदारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. शुक्ला यांचं घर तीन दिवस बंद होतं. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि हत्या उघडकीस आली.

विधानसभा निवडणूक निकाल

होम लोन आणि कार लोन महागणार

शुक्ला यांची हत्या उघड होण्याच्या 3 दिवस आधी सीताराम भाटणे हा शुक्ला यांच्या घरात रात्री शिरला होता अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. नंतर घर बाहेरून बंद करण्यात आले. सीतारामने घरातून भांडी चोरली होती. सीतारामला आधीपासूनच चोरी करण्याची सवय असल्याचे त्याच्या भावांडांनी पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी सीतारामच्या अटकेसाठी वॉरंट काढले. 

सीताराम भाटणेविरोधात कलम ३०२ आणि ३९२ च्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही. एस. सेठी यांनी सीतारामविरोधात सरदार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर सीतारामचा शोध सुरू झाला. पण संबंधित व्यक्ती पोलिसांना सापडत नव्हती. यामुळे दरवर्षी अधूनमधून सीतारामच्या शोधाची मोहिम पोलीस राबवत होते. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फरार गुन्हेगारांचा शोध सुरू केला. काही गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. यातून त्यांना 1973 मधील हत्येच्या प्रकरणातील आरोपी सीतारामचा शोध लागला. सीतारामला नगरमधील राजनी गावातून अटक करण्यात आली. 

मणी शुक्ला रात्री झोपलेल्या असताना सीताराम त्यांच्या घरात शिरला. तो भांडी चोरत असताना शुक्ला यांना जाग आली. त्यांनी सीतारामला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीतारामने शुक्ला यांची हत्या करून पळ काढला.

सीतारामचे नातलग नगर जिल्ह्यात असल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी नगर जिल्ह्यातील पोलिसांच्या मदतीने शोध सुरू केला. अखेर सीतारामला शोधून अटक करण्यात आली. आधारकार्डच्या आधारे पोलिसांनी सीतारामची ओळख पटविली. यानंतर अहमदाबाद पोलिसांनी सीतारामला मणी शुक्ला हत्या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईसाठी अहमदाबाद येथे नेले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी