धुळ्यातील आरोपींना नगरमध्ये अटक, दोन गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतुसे जप्त

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 26, 2020 | 17:28 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक करून गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करून आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accused arrested in ahmednagar with live cartridges along with pistol
धुळ्यातील आरोपींना नगरमध्ये अटक, दोन गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतुसे जप्त  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
  • धुळे जिल्ह्यातील दोघांना अटक
  • आरोपींकडून दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त

अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील (Dhule District) शिरपूर (Shirpur) येथील चुण्णीलाल पावरा आणी दिलीप पावरा यांच्याकड़े गावठी कट्टा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनां मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अहमदनगर (Ahmednagar) येथील तारकपूर परिसरात सापळा रचला आणि या दोन्ही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडे पोलिसांना दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे आढळून आली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक करून गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करून आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हेगारी व गुन्हेगारांवर खाकीचा दरारा तयार केला होता. जिल्ह्यांमध्ये दरोडे, हत्या, वाळूची तस्कर, चैन स्नॅचिंग असे एक ना अनेक प्रकार बंद झाले होते. मात्र पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची बदली होताच अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरवात केली. 

मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल ककटे यांनी देखील खाकीचा दरारा कायम ठेवत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली. अहमदनगर जिल्ह्यातून गुन्हेगारीचा पूर्णपणे नायनाट होईल अशी अपेक्षा आता नगरकर करू लागले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी