Rupali Chakankar : सॅटेलाईटच्या माध्यमातून माझा मेंदू ताब्यात घेतला आणि माझा छळ केला, रुपाली चाकणकरांना धमकी देणार्‍याचा अजब दावा

नगर
तुषार ओव्हाळ
Updated May 31, 2022 | 15:53 IST

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी देणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून माझा मेंदू ताब्यात घेतला होता, त्यानंतर माझा आणि माझ्या पत्नीचा छळ करण्यात आला होता असा अजब दावा या व्यक्तीने केला आहे. इतकेच नाही तर सध्या आपल्याला अटक केली नसून पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे असेही आरोपीने म्हटले आहे.

थोडं पण कामाचं
  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी देणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
  • सॅटेलाईटच्या माध्यमातून माझा मेंदू ताब्यात घेतला होता,
  • त्यानंतर माझा आणि माझ्या पत्नीचा छळ करण्यात आला होता असा अजब दावा या व्यक्तीने केला आहे.

Rupali Chakankar : अहमदनगर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी देणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून माझा मेंदू ताब्यात घेतला होता, त्यानंतर माझा आणि माझ्या पत्नीचा छळ करण्यात आला होता असा अजब दावा या व्यक्तीने केला आहे. इतकेच नाही तर सध्या आपल्याला अटक केली नसून पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे असेही आरोपीने म्हटले आहे. आरोपीचे नाव भास्कर शिंदे असून तो अहमदनगरचा रहिवासी आहे. 

चाकणकर यांना दिली होती धमकी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ३० मे रोजी अहमदनगरमधून एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या चिंचोडी तालुक्यातून भास्कर शिंदेला अटक केली. अटक केल्यानंतर ही धमकी का दिली यावर शिंदेने अजब दाव केले आहेत.

सॅटेलाईटच्या माध्यामतून मेंदू घेतला ताब्यात

पोलीस चौकशीत आरोपी भास्कर शिंदेने रुपाली चाकणकर यांना धमकी दिल्याचे कबुल केले. परंतु सॅटेलाईटद्वारे आपला मेंदू ताब्यात घेण्यात आला होता. तसेच अशा प्रकारे आपल्या बायकोचाही छळ करण्यात आला होता. या प्रकरणी आपण महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. परंतु आयोगाने आपल्या तक्रारीची दखलच घेतली नाही म्हणून आपण हे कृत्य केल्याचेही आरोपी शिंदेने म्हटले आहे. इतकेच नाही सध्या आपल्याला पोलिसांनी अटक केली नसून त्यांनी आपल्याला सुरक्षा पुरवल्याचेही म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी