केजरीवालांच्या विजयानंतर राळेगणमध्ये फुटले फटाके! 

नगर
उमेर सय्यद
Updated Feb 11, 2020 | 16:22 IST

दिल्ली विधानसभेत सलग दिसऱ्यांदा विजय मिळविणाऱ्या आप पक्षाचं देशातील अनेक ठिकाणी कौतुक केलं जात आहे. राळेगणसिद्धीमध्ये देखील आज फटाके फोडून आ

after the victory of arvind kejriwal played firecrackers in the ralegan siddhi
केजरीवालांच्या विजयानंतर राळेगणमध्ये फुटले फटाके!  |  फोटो सौजन्य: Times Now

अहमदनगर: दिल्लीच्या जनेतेने आम आदमी पार्टीच्या बाजूने कौल दिला असून दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांचं सरकार आल्याने अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधील ग्रामस्थांनी  केजरीवालांच्या विजयात सहभागी होत राळेगणसिद्धी गावामध्ये फटाके वाजवून आनंद साजरा केला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजकीय प्रवास अण्णा हजारेंच्या लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मागणीसाठी २०११ साली झालेल्या आंदोलनानंतर सुरु झाला होता. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या समाजिक क्षेत्रात काम करत असताना अरविंद केजरीवाल यांनी २ ऑक्टोबर २०१२ साली सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात उडी घेत आम आदमी पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या डोक्यावर गांधी टोपी घालून सर्वाचे लक्ष वेधले होतं. 

पक्षाची स्थापना झाल्यानंतर २०१३ साली दिल्लीमध्ये अण्णा हजारेंचे शिष्य मानले जाणारे अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शीला दीक्षित यांना कडवे आव्हान देत पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर २०१५ साली झालेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी तब्बल ६७ जागा मिळवत ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री विराजमान झाले होते. आता तिसऱ्यांदा पुन्हा केजरीवाल यांचंच सरकार सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झाल्याने मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांची हॅटट्रिक होणार आहे.   

दरम्यान, २०२० विधानसभा निवडणुकीत पुन्हा भारतीय जनता पक्षाचं कडवं आव्हान मोडून काढत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेवर 'आप'चा झेंडा फडकावला आहे. दरम्यान,  केजरीवालांचा विजय जरी दिल्लीत झाला असला तरी राळेगणसिद्धी येथील नागरिकांना हा आपलाच विजय वाटत असल्याने त्यांनी गावात फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला. 
 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी