Ahmednagar fire: अहमदनगरमधील गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग; 80 जण अडकल्याची भीती

नगर
भरत जाधव
Updated Feb 25, 2023 | 22:07 IST

अहमदनगरमधील (Ahmednagar) बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याला (Gangamai Sugar Factory) भीषण आग ( fire) लागली आहे. शेवगाव तालुक्यातील सीमा हद्दीपासून जवळच असलेल्या बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या डीसलरी विभागात मोठा स्फोट झाला त्यानंतर आग लागली आहे.

A massive fire broke out at Gangamai Sugar Factory in Ahmednagar
अहमदनगरमधील गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • इथेनॉलच्या टाकीला आग लागून झालेल्या या स्फोटात अनेक कर्मचारी जखमी
  • आग लागलेल्या ठिकाणी 70 ते 80 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
  • अहमदनगर, औरंगाबाद, शेवगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे.

अहमदनगर :  अहमदनगरमधील (Ahmednagar) बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याला (Gangamai Sugar Factory) भीषण आग ( fire) लागली आहे. शेवगाव तालुक्यातील सीमा हद्दीपासून जवळच असलेल्या बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या डीसलरी विभागात मोठा स्फोट झाला त्यानंतर आग लागली. इथेनॉलच्या टाकीला आग लागून झालेल्या या स्फोटात अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. इथेनॉलच्या चार टाक्यांना ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.   (ahmednagar fire broke out in gangamai sugar mill factory )

अधिक वाचा  : वीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त Imagesद्वारे करा अभिवादन

आग लागलेल्या ठिकाणी 70 ते 80 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. अहमदनगर, औरंगाबाद, शेवगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे.  शेवगाव तालुका तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल डेपोला आग लागली. यात चार टाक्यांचा स्फोट झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.  

अधिक वाचा  : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रेरणादायी विचार

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार, मृत्यू संख्या नाही आणि मृत्यूचा आकडा देखील इतका मोठा असेल असं वाटत नाही. कारखान्यात 150 कामगार काम करत होते. दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीमुळे आकाशात धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते.आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी