Ahmadnagar news : अहमदनगर महापालिकेचा बाळासाहेब देशपांडे दवाखाना बनला मृत्यूचा सापळा 

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 25, 2021 | 13:25 IST

Balasaheb deshpande hospital condition : अहमदनगर महानगर पालिकेकडून  महानगरपालिकेचा बाळासाहेब देशपांडे दवाखाना स्थलांतरित करण्याचे हालचाली सुरू झाल्या आहेत.

Ahmednagar Municipal Corporation's Balasaheb Deshpande Hospital became a death trap
अहमदनगर महापालिकेचा देशपांडे दवाखाना बनला मृत्यूचा सापळा 
थोडं पण कामाचं
  • अहमदनगर महानगर पालिकेकडून  महानगरपालिकेचा बाळासाहेब देशपांडे दवाखाना स्थलांतरित करण्याचे हालचाली सुरू झाल्या आहेत.  
  • दुसरीकडे सद्यस्थितीत या दवाखान्यात दाखल असलेल्या गोरगरीब गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना आपला जीव धोक्यात घालत उपचार घ्यावा लागत आ
  • मृत्यूचा सापळा झालेल्या महानगरपालिकेच्या याच बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात जिल्हा रुग्णालय शॉर्ट सर्किटसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

Balasaheb deshpande hospital condition : अहमदनगर (Ahmadnagar) महानगर पालिकेकडून  महानगरपालिकेचा बाळासाहेब देशपांडे दवाखाना (Balasaheb Deshpande Hospital )स्थलांतरित करण्याचे हालचाली सुरू झाल्या आहेत.  मात्र एकीकडे स्थायीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आला असला तरी दुसरीकडे सद्यस्थितीत या दवाखान्यात दाखल असलेल्या गोरगरीब गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना आपला जीव धोक्यात घालत उपचार घ्यावा लागत आहे. (Ahmednagar Municipal Corporation's Balasaheb Deshpande Hospital became a death trap)

मृत्यूचा सापळा झालेल्या महानगरपालिकेच्या याच बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात जिल्हा रुग्णालय शॉर्ट सर्किटसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Balasaheb Deshpande Hospital 1  

बाळासाहेब देशपांडे हा प्रसूती दवाखाना येथे गोरगरीब गर्भवती महिला आपला जीव धोक्यात घालून  प्रसूतीसाठी दाखल होतात.या दवाखान्यात तब्बल ७० बेड आहे, परंतु येथे प्रवेश करताच भलामोठा विद्युत बोर्ड ते देखील उघडा पडलेला दिसतो आहे. चोहीकडे चिकटपट्टीने चिट्कवलेल्या वायरी बघून चक्क या दवाखान्याला खरंच कोणी वाली आहे का? असाच प्रश्न पडतो 

दवाखान्यात फायर सेफ़्टीच्या दृष्टीने लागणारे एकही उपकरण उपलब्ध नाही. फ़क्त भिंतीवर काही प्रमाणात फायर एक्सटिग्युशर वगळता आग लागल्यास आग विझविणार कशी कदाचित याचा अभ्यास अहमदनगरच्या राजकीय नेत्यांनी करायला हवा. परंतु त्याकडे लक्ष न देता डायरेक्ट दवाखान्याच्या इमारतीचच स्थलांतर करण्याच्या सूचना या लोकप्रतिनिधींनी केल्या आहे. मात्र त्यांनी जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेतून बोध घ्यायला हवा आहे. जुन्या इमारतीच स्थलांतर होईल त्यावेळी होईल मात्र दुर्दैवाने जर त्याआधी काही दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? याचा विचार कोणीच केलेला दिसत नाही. 

Balasaheb Deshpande Hospital 2

दवाखान्याच्या पहिल्या मजल्यापासून तर चक्क वार्डात ऍडमिट असलेल्या गर्भवती महिलांच्या डोक्यावर वायरी लोंबकळत असतांना दिसत आहे. दुर्दैवाने आग लागल्यास त्यासाठी लागणारे स्मोकर, अलार्म, स्प्रीक्लर, वॉटर टँक यासह आदी साहित्य उपलब्ध नाही. याची दक्षता कोण घेणार?  

याबाबत आरोग्य अधिकारी डॉक्टर राजूरकर यांना विचारले असता त्यांनी तर आमचे इलेक्ट्रिकसिटी अधिकारी वेळोवेळी वायरी चेक करत असल्याची प्रतिक्रिया दिली. आम्ही दवाखान्यांच्या इमारतीची संपूर्ण वायरिंग मागील दोन वर्षांपूर्वीच बदलण्याचा प्रस्ताव पालिकेत ठेवला होता, मात्र ही इमारत ५० वर्षांपूर्वीची असून ती इमारत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव असल्याने तेथे वायरिंग बदलण्याचा प्रस्ताव मंजूर झाला नसल्याची धक्कादायक माहितीच त्यांनी दिली आहे.  

Balasaheb Deshpande Hospital 3

काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ११ जणांना आपला जीव लागला तर या आगीत जखमी झालेल्यांपैकी ३ जण देखील उपचारादरम्यान मयत झाले. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकूण १४ जणांचा जीव गेला आहे.

परंतु नगर शहरात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन विशेष करून फायर ऑडिटसाठी परवानगी देणारी महानगरपालिका हे किती जागरूक आहे हे त्यांच्याच असलेल्या बाळासाहेब देशपांडे दवाखान्याकड़े पाहिल्यावर समजते. त्यामुळे वेळीच लोकप्रतिनिधींनी आणि पालिका आयुक्तांनी  जागरूकता दाखवत देशपांडे दवाखान्याला संभाव्य धोका होणार नाही या भरवशावर न सोडता नवीन वायरिंग करण्याची गरज निर्माण झाली , जुन्या इमारतीच स्थलांतर होईल त्यावेळी होईल मात्र दुर्दैवाने जर त्याआधी काही दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी