Ahmednagar: चोरट्यांचा नवा फंडा, सोने गहाण ठेवत बँकेला घातला लाखोंचा गंडा, आता पोलिसांनी अटक करुन चालवला दांडा

नगर
उमेर सय्यद
Updated Sep 08, 2022 | 13:40 IST

Crime News in Marathi: अहमदनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. बँकेला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. 

Ahmednagar police arrest a gang who deposit fake gold and cheated lakh of rupees with bank crime news read in marathi
Ahmednagar: चोरट्यांचा नवा फंडा, सोने गहाण ठेवत बँकेला घातला लाखोंचा गंडा, आता पोलिसांनी अटक करुन चालवला दांडा 
थोडं पण कामाचं
  • नगर शहरातील धक्कादायक प्रकार
  • बँकेत बनावट सोने गहाण ठेवत लाखोंचा घातला गंडा 
  • तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ahmednagar News: अहमदनगर शहरात (Ahmednagar City) एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  अहमदनगर शहर बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची फसवणूक (Cheating with bank) करत बँकेकडून 26 लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. मात्र या गुन्ह्यात आणखीन धक्कादायक खुलासे होणार असून काढलेले कर्ज हे कोट्यवधी रुपयांचे असण्याची शक्यता आहे.

या संदर्भात पोलिसांनी बँकेच्या सोने तारण कर्जसाठी सोने तपासून घेणाऱ्या गोल्ड व्हँल्युअरसह आणखीन दोन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्जदार अक्षय निकाळजे आणि शहर बँकेचे गोल्ड व्हँल्युअर कपाले यांच्यात मैत्री होती. मैत्री असल्याने अर्जदार यांनी कपाले यांस हात उसने वीस हजार रुपयाची मागणी केली होती.

हे पण वाचा : बंगळुरूत पावसामुळे हाहाकार

त्यानुसार बँकेचे गोल्ड व्हँल्युअर अजय कपाले यांनी अर्जदार यांस वीस हजार दिले मात्र त्या मोबदल्यात तुझ्या नावावर शहर बँकेतून सोने तारण कर्ज करून देतो. तसेच सोने देखील माझेच असेल असे सांगितले होते.

हे पण वाचा : मुंबईसह ६ शहरे कायमची पाण्याखाली जाण्याचा धोका

त्यानुसार अर्जदार याने गोल्ड व्हँल्युअर असलेल्या मित्राला होकार दिला. त्यानंतर गोल्ड व्हँल्युअरने आपल्या दोन साथीदारांना हाताशी धरून बँकेतून अर्जदाराच्या नावे 6 लाख रुपये कर्ज घेत आपल्या साथीदारामध्ये वाटप करून घेतले होते.

दरम्यान ही बाब अर्जदार अक्षय निकाळजे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत आरोपींनीं तब्बल 26 लाखांचा बँकेला गंडा घातला असल्याचे निष्पन्न झाले. मात्र ही बाब इथेच न थांबता यामध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी