अहमदनगर : अहमदनगरमधून जाणाऱ्या नगर - मनमाड, नगर -सोलापूर , नगर - पाथर्डी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरवात केली आहे.
अधिक वाचा : उदयनराजे आक्रमक; शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या 'त्या' वक्तव्याविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र
विशेषतः अहमदनगर मनमाड महामार्गाची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. या महामार्गावर असलेल्या शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. याच रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप प्रवाशांचा जीव गेला आला. या रस्त्यांचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी निलेश लंके यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
अधिक वाचा : Cyclone Mandous: मंदोसमुळे महाराष्ट्रावर अस्मानी संकट,अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
आमदार लंकेनी इशारा देऊनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने मंगळवारपासून उपोषण सुरु केले आहे. लंकेच्या या आंदोलनाला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे महसूलमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री यांनी निलेश लंकेवर निशाणा साधत आंदोलन म्हणजे नौटकी असल्याची टीका केली.