Anna Hazare : अहमदनगर : गेल्या १२ वर्षांपासून लोकायुक्तसाठी आपण लढा दिला. आपल्या देशाची परंपरा आहे तप केल्याशिवाय काही मिळत नाही मात्र आज 12 वर्षानंतर लोकायुक्त कायद्याला मंजुरी मिळाली आहे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले. तसेच शिंदे आणी फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय क्रांतीकारी निर्णय आहे. या निर्णयाचे महत्त्व अनेकांना आज नाही कळणार, मात्र भविष्यात लोकांना हा कायदा किती महत्त्वाचा आहे हे कळेल असेही अण्णा म्हणाले.
अण्णा म्हणाले की या कायद्यासाठी आम्ही उपोषण केली, पत्र लिहिली. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यांचे सरकार गेल्यानंतर आम्ही ठाकरे सरकारला पत्र लिहिली. मात्र त्यांनीही लक्ष दिले नाही शेवटी आज शिंदे फडणवीस सरकारने या कायद्याला मंजुरी दिली आहे. माझ दोघांशी बोलणं झालं मी त्यांचे आभार मानले आहेत. या कायद्यामुळे नक्कीच महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल. या कायद्याचा मसुदा भक्कम असून मसुदा तयार करण्यासाठीच तब्बल तीन वर्ष लागले, त्यामुळे मला विश्वास आहे कीं शिंदे फडणवीस यांनी घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक निर्णय ठरेल असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला.