Anna Hazare : केजरीवाल दोषी असतील तर शिक्षा झाली पाहिजे : अण्णा हजारे

नगर
रोहन जुवेकर
Updated Apr 16, 2023 | 17:46 IST

anna hazare reaction on cbi notice to delhi cm arvind kejriwal : दारू घोटाळा प्रकरणी तपास सुरू आहे. मनीष सिसोदिया जेलमध्ये आहेत. आता सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या घडामोडींवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आली आहे.

anna hazare reaction on cbi notice to delhi cm arvind kejriwal
केजरीवाल दोषी असतील तर शिक्षा झाली पाहिजे : अण्णा हजारे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • केजरीवाल दोषी असतील तर शिक्षा झाली पाहिजे : अण्णा हजारे
  • शुद्ध आचरण ठेवा हा सल्ला देणाऱ्या अण्णांनी दारू घोटाळा प्रकरणात जाहीर केली त्यांची भूमिका
  • मला आता दु:ख होत आहे : अण्णा हजारे

anna hazare reaction on cbi notice to delhi cm arvind kejriwal : दारू घोटाळा प्रकरणी तपास सुरू आहे. मनीष सिसोदिया जेलमध्ये आहेत. आता सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या घडामोडींवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आली आहे. अरविंद केजरीवाल दोषी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे अण्णा हजारे म्हणाले. 

शुद्ध आचरण ठेवा हा सल्ला देणाऱ्या अण्णांनी दारू घोटाळा प्रकरणात त्यांची भूमिका ठामपणे मांडली. दिल्ली सरकारची दारू घोटाळा प्रकरणात चौकशी सुरू आहे. सीबीआय तपास करत आहे. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे म्हणाले. 

दिल्ली सरकारने दारू विक्री धोरण राबवताना मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या जेलमध्ये आहेत. आता केजरीवाल यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलाविले आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची स्थापना अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून झाली. या पक्षात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोन प्रमुख नेते होते. पक्ष स्थापन झाला त्यावेळी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोघे अण्णांचे शिष्य समजले जात होते. याच कारणामुळे दारू विक्री धोरण प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू झाल्यावर मीडियाने अण्णा हजारेंना प्रश्न विचारले. या प्रश्नांना अण्णांनी उत्तर दिले. 

आमच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनातूनच आम आदमी पार्टीचा जन्म झाला. केजरीवाल आणि त्यांच्यासोबत सिसोदिया यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही मात्र आमचा तो मार्ग नसल्याचे सांगितले. त्यावेळी एकही दिवस असा नव्हता की मी या लोकांना शुद्ध आचारविचारबाबत सल्ला दिला नव्हता. मला आता दु:ख होत आहे की, सिसोदियासारखा नेता जेलमध्ये आहे. जेलमध्ये जावे पण समाज आणि देशाच्या भल्यासाठी. स्वत:च्या भल्यासाठी नाही, असे मी मानतो; असे अण्णा हजारे म्हणाले. 

मी पूर्वीच केजरीवाल यांना एक पत्र लिहिले होते. त्यांना सांगितले होते की, हा दारूचा विषय सोडून द्या. दारूमुळे कोणाचेही भले झालेले नाही. पैशासाठी काहीही करणे अयोग्य आहे. चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे; असेही अण्णा हजारे म्हणाले. 

शंकराला प्रसन्न करून आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी करा हे उपाय

किती शिकले आहेत दिग्गज भारतीय उद्योगपती

शिंक येणे शुभ की अशुभ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी