आधी केजरीवालसोबत आता चंद्रशेखर रावांसोबत उभे राहणार ८५ वर्षांचे अण्णा हजारे, चर्चेला उधाण

नगर
रोहन जुवेकर
Updated Jun 15, 2022 | 12:40 IST

Anna Hazare stand with Kejriwal and now with Chandrasekhar Rao says reports : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. अण्णांनी ८६व्या वर्षात पदार्पण केले.

Anna Hazare stand with Kejriwal and now with Chandrasekhar Rao says reports
आधी केजरीवालसोबत आता चंद्रशेखर रावांसोबत उभे राहणार ८५ वर्षांचे अण्णा हजारे, चर्चेला उधाण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आधी केजरीवालसोबत आता चंद्रशेखर रावांसोबत उभे राहणार ८५ वर्षांचे अण्णा हजारे, चर्चेला उधाण
  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस, ८६व्या वर्षात पदार्पण
  • अण्णांनी १९८० पासून आतापर्यंत १६ उपोषणे केली

Anna Hazare stand with Kejriwal and now with Chandrasekhar Rao says reports : राळेगणसिद्धी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. अण्णांनी ८६व्या वर्षात पदार्पण केले. समाजहितासाठी आंदोलन करण्याकरिता प्रसिद्ध असलेल्या अण्णांनी ८५ वर्षांचा टप्पा ओलांडला. एरवी या वयाचे नागरिक घरात बसून विश्रांती घेणे पसंत करतात. पण अण्णा हजारे पुन्हा सक्रीय होण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. अरविंद केजरीवाल यांना साथ देणारे अण्णा हजारे आता तेलंगणाच्या के. चंद्रशेखर राव यांना साथ देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

लोकपाल कायद्याची मागणी करत अरविंद केजरीवाल यांना जाहीर पाठिंबा देऊन अण्णा हजारे यांनी दिल्लीत उपोषण केले. या सगळ्यातून केजरीवाल यांना राजकीय फायदा झाला. अण्णा राळेगणसिद्धीत राहिले आणि केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना भक्कम आधार म्हणून त्यांनी अण्णांची साथ मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. अण्णांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याबाबतही चाचपणी सुरू असल्याचे वृत्त आहे. 

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना अण्णा किती पाठिंबा देणार याविषयी मतमांतरे आहेत. पण वाढदिवस आणि तर्कवितर्कांना आलेले उधाण यामुळे अण्णा हजार चर्चेत आहेत. 

कोण आहेत अण्णा हजारे?

किसन बाबूराव हजारे म्हणजेच अण्णा हजारे. अण्णांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारमधील खोमणे वाड्यात १५ जून १९३७ रोजी झाला. सैन्य दलात वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या अण्णांनी १९७५ मध्ये सेवेतून बाहेर पडून राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट केला. अण्णांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. 

अण्णांनी १९८० पासून आतापर्यंत १६ उपोषणे केली. यापैकी १३ उपोषणे महाराष्ट्र सरकार विरोधात तर ३ केंद्र सरकार विरोधात केली. अण्णांच्या उपोषणामुळे काही मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला. 

दारूबंदी, पाणी नियोजन, स्वच्छता अशी वेगवेगळी समाजोपयोगी कामं करणारे अण्णा आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांना साथ देणार का, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी