[VIDEO] 'धनाढ्य शक्तीला जनता कौल देणार नाही', राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका    

नगर
Updated Oct 22, 2019 | 09:16 IST | ऊमेर सय्यद

Ram Shinde Criticizes Pawar Family: विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदार संघात यंदा बरीच चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.  

bjp candidate ram shinde criticizes pawar family vidhansabha election 2019 
'धनाढ्य शक्तीला जनता कौल देणार नाही', राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका      |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राम शिंदे यांना रोहित पवारांचं तगडं आव्हान
  • कर्जत-जामखेडमध्ये कोण मारणार बाजी?
  • राम शिंदेंना मतदार पुन्हा संधी देणार?

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे निकालांकडे लागून राहिलं आहे. दरम्यान, राज्यात काही असे मतदारसंघ आहे की, ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघ. कारण या मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांच्यात लढत आहे. ही लढत मोठी चुरशीची झाली असल्याचं सध्या समजतं आहे. दरम्यान, याचविषयी बोलताना भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलं आहे. 

'गेल्या ५० वर्षापासून कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या धनाढ्य घराण्याने एकही विकास काम केले नसल्याने अश्या धनाढ्य शक्तीला जनता कौल देणार नाही.' अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली आहे.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनिमित्त घोषणा केली होती की, राम शिंदे यांना मोठं मंत्री पद दिलं जाईल. याबाबत बोलताना राम शिंदे असं म्हणाले की, 'नक्कीच मी या निवडणुकीत विजयी होऊन मुख्यमंत्री देईल ते खाते सांभाळणार.' 

मंत्री राम शिंदे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला असला तरीही ही निवडणूक त्यांना वाटते तेवढी सोपी गेलेली नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित पवार यांच्या रुपाने एक तरुण नेतृत्वाला उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे कर्जत-जामखेडकरांसमोर एक नवा पर्याय देखील होती. त्यामुळे येथील मतदारांनी नेमकी कुणाला साथ दिली आहे याबाबतचं चित्र अद्याप तरी अस्पष्ट आहे. कारण रोहित पवार यांनी देखील तोडीस तोड प्रचार केल्याने येथील मतदारसंघात निवडणुकीदरम्यान कमालीचा उत्साह पाहायला मिळाला होता. तर दुसरीकडे राम शिंदे यांनी देखील आपली संपूर्ण ताकद पणाला लावून मतदारसंघात प्रचार केला होता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मतदारसंघात सभा घेतली होती. त्यामुळे आता या अटीतटीच्या लढाईत नेमकं कोण बाजी मारतं याकडेच सगळ्याचं लक्ष लागून राहिलं. 

दरम्यान, या मतदारसंघातील काही भागांमध्ये मात्र राम शिंदे यांच्याबाबत नाराजी देखील पाहायला मिळाली होती. कारण प्रचारादरम्यान, एका गावात मतं मागण्यासाठी गेलेले भाजपचे उमेदवार आणि कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांना थेट गावकऱ्यांच्या रोषालाच सामोरं जावं लागलं होतं. यावेळी गावकऱ्यांनी राम शिंदेंसमोर फक्त आपला रोषच व्यक्त केला नाही तर थेट शिंदे यांचे विरोधी उमेदवार रोहित पवार यांच्या नावाच्या घोषणाही दिल्या. यामुळे राम शिंदे यांनी सभेतून काढता पाय घेतला. पण यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक फार सोपी नसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
[VIDEO] 'धनाढ्य शक्तीला जनता कौल देणार नाही', राम शिंदेंची पवार कुटुंबीयांवर टीका     Description: Ram Shinde Criticizes Pawar Family: विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदार संघात यंदा बरीच चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.  
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...