mns workers arrested: चहापाण्याला बोलवलं अन् अटक केली; बनवली खोटी नोटीस, मनसे कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप

नगर
भरत जाधव
Updated May 03, 2022 | 16:16 IST

राज्यातील वातावरण खराब होऊ नये म्हणून राज्यातील गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. संगमनेरमध्येही (Sangamner) अशीच कारवाई करण्यात आली. परंतु येथील कार्यकर्त्यांना चहापाण्याचं आमंत्रण देत त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

MNS activists arrested
चहापाण्याला बोलवून मनसे कार्यकर्त्यांची अटक  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आम्हाला चहा पाणीसाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक अटक
  • पोलिसांनी ९ एप्रिलची निवेदन दिल्याची खोटी घटना सांगून कार्यकर्त्यांना अडकविण्याचा प्रयत्न

अहमदनगर: राज्यातील वातावरण खराब होऊ नये म्हणून राज्यातील गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. संगमनेरमध्येही (Sangamner) अशीच कारवाई करण्यात आली. परंतु येथील कार्यकर्त्यांना चहापाण्याचं आमंत्रण देत त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

आम्हाला चहा पाणीसाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक अटक केली. काहीही संधी न देता लगेच न्यायालयात नेले, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून याबद्दल पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा निषेध करण्यात आला.संगमनेर येथे मनसे पदाधिकारी शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये पोलिसांचा निषेध करण्यात आला. त्यांनी सांगितले की, काहीही कारण नसताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी चहा पाणीसाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव केला. अचानकपणे संगमनेरमध्ये असलेल्या धडक कृती दलाच्या पथकांना बोलावून कार्यकर्त्यांना यांना अटक करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वांचे मोबाईलही पोलिसांनी बळजबरीने काढून घेतले होते.

मात्र, न्यायालयात वकील श्रीराम गणपुले यांची भेट झाली. त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू मांडली. पोलिसांनी ९ एप्रिलची निवेदन दिल्याची खोटी घटना सांगून कार्यकर्त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वकिलांनी कार्यकर्त्यांची बाजू मांडल्याने सर्वांची सुटका झाली, असे सांगत पोलिसांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला.

Read Also : राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडीओ भाजपकडून व्हायरल

या विषयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेतली असून पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शरद गोर्डे यांनी दिली. नगर जिल्ह्यात कुठेही मनसे पदाधिकारी यांच्यावर कारवाई झाली नाही, फक्त संगमनेरमध्येच का झाली? यामागे कोण आहे? येथे मनसे पक्ष वाढू नये, असा कोणाचा प्रयत्न आहे का? अशा शंकही उपस्थित करण्यात आल्या.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी