Coronavirus: अहमदनगरमध्ये एका दिवसात ६ मृत्यू, कोविडचे नियम मोडणाऱ्यां विरोधात पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

नगर
उमेर सय्यद
Updated Feb 27, 2021 | 16:54 IST

अहमदनगरमध्ये नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडीशी घटली असली तरी मृत्यूचे आकडे चिंता वाढविणारे असल्याने आता पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

Coronavirus in Ahmednagar 6 died in day police start action against violating norms
अहमदनगरमध्ये एका दिवसांत ६ मृत्यू, नियम मोडणाऱ्यां विरोधात पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये   |  फोटो सौजन्य: Facebook

अहमदनगर : कोरोनाचे (Coronavirus) नियम मोडणाऱ्यांवर उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री शहरातील बाजारपेठेत गर्दी करणाऱ्या तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात करोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडीशी घटली असली तरी मृत्यूचे आकडे चिंता वाढविणारे असल्याने आता पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. 

शुक्रवारी (२६ फेब्रुवारी २०२१) दिवसभरात १८६ कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत ११४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दररोज नव्याने दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांनाची संख्या घटली असली तरी मात्र मृत्यूचे आकडे हे चिंता वाढविणारे आहे. शुक्रवारी एका दिवसात ६ जणांचा तर एका आठवड्यात तब्बल २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान अहमदनगरमध्ये रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी असली तरी नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री शहरातील मुख्य बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणच्या हॉकर्स तसेच दुकानदारांना देखील समज देण्यात आली असुन नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी दिला आहे. 

दरम्यान आत्तापर्यंत बरे झालेली रुग्णांची संख्या ही ७३२८२ असुन उपचार सुरू असलेले रूग्ण हे  १०१५ इतके आहे तर मृत्यू ११४० असुन एकूण रूग्ण संख्या ही ७५४३७ इतकी झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी