Balaseheb Murkute । Video : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास घेण्याचा प्रयत्न

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 23, 2021 | 20:25 IST

BJP Ex MLA trying to commit suicide : वीज वितरण कंपनीने थकीत बील वसूल न झाल्याने कृषी पंप वीज तोडणी केल्याने आक्रमक झालेल्या भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

Ex MLA Balasaheb murkute trying to commit suicide for farm electricity cut issue
बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास घेण्याचा प्रयत्न 
थोडं पण कामाचं
  • वीज वितरण कंपनीने थकीत बील वसूल न झाल्याने कृषी पंप वीज तोडणी केल्याने भाजप आक्रमक
  • भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
  • तीन तास ठिय्या आंदोलन करून ही मागणी मान्य होत नसल्याने भाजप माजी आमदार आणि कार्यकर्ते आक्रमक झाले.

 Balaseheb Murkute video Viral  ।नेवासा : वीज वितरण कंपनीने थकीत बील वसूल न झाल्याने कृषी पंप वीज तोडणी केल्याने आक्रमक झालेल्या भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास घेण्याचा प्रयत्न केला.   (Ex MLA Balasaheb murkute trying to commit suicide for farm electricity cut issue )

कृषीपंप वीज तोड विरोधात भाजप आक्रमक झाले असून माजी आमदार मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

तीन तास ठिय्या आंदोलन करून ही मागणी मान्य होत नसल्याने भाजप माजी आमदार आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर मुरकुटे यांनी कार्यालयात छताला दोर बांधून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदारांना अडवले आणि अनुचित प्रकार होण्यापासून परावृत्त केले. 

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघातील धक्कादायक प्रकार. घडला आहे. वीज कार्यालयातील व्हीडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होते आहे. 
कार्यकर्त्यांनी मुरकुटे यांनी रोखल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता बाळासाहेब मुरकुटे यांची प्रकृती स्थिर आहे. 

भाजप नेवासा तालुका व शेतकऱ्यांच्या वतीने आज विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्ये सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. मुरकुटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास विनंती केली की, आज शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्याकडे कुठलेही पिक सध्या हातात नाही. साखर कारखाने नुकतेच चालू झाल्यामुळे अजून शेतकऱ्याकडे ऊसाचेही पेमेंट आले नाही. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी. मात्र, वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे वातावरण तापले. त्यानंतर नेवासाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तिथे दाखल झाले. त्यांनीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर तोडगा न निघाल्याने मुरकुटे यांनी विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील शेतकरी व आंदोलक यांनी तात्काळ मुरकुटे यांना पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

balaseheb murkute

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी