बनावट आर्मी NOC प्रकरण: दाखल फिर्याद स्क्रिप्टेड?, त्या निवेदनामुळे अनेक प्रश्न उपस्थित

नगर
उमेर सय्यद
Updated Oct 06, 2022 | 14:49 IST

Ahmednagar Crime: अहमदनगरमधील बनावट NOC प्रकरणी आता एक नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महसूलचा उपविभागीय कार्यालय आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

fake no objection certificate of army headquarters army employee arrested
Ahmednagar: आर्मी हेडक्वाटरचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र, आर्मीच्या कर्मचाऱ्याला अटक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आर्मीच्या राजा ठाकूर या कर्मचाऱ्याला अटक
  • 28 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये अनोळखी इसमावर गुन्हा दाखल
  • महसूलचा उपविभागीय कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात

Fake NOC Case: अहमदनगर:  बांधकाम परवानगीसाठी आर्मी हेडक्वाटरचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र बनवून महसूल उपविभागीय कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी आर्मी इंटेलिजन्स आणि कोतवाली पोलिसांनी कारवाई करत आर्मीच्या राजा ठाकूर या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. (fake no objection certificate of army headquarters army employee arrested)

दरम्यान उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्याने कोतवाली पोलीस ठाण्यात 28 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे. 

अधिक वाचा: गुजरातमधील वडोदरा येथे धार्मिक ध्वजावरून वाद, दोन गटात मारामारी, 36 जणांना अटक

मात्र 28 सप्टेंबर रोजी दाखल होणाऱ्या अनोळखी इसमाच्या गुन्ह्याबाबतची माहिती समाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी 27 सप्टेंबर रोजीच महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांना दिलेल्या निवेदनात दिली आहे. महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना देण्यात आलेल्या निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणेच 28 सप्टेंबरचा गुन्हा दाखल झाल्याने महसूलचा उपविभागीय कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे आता पोलीस त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

सामजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम परवानगीसाठी आर्मी स्टेशन हेडक्वाटरच्या नावे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले. मात्र बांधकाम परवानगीसाठी ज्यांनी अर्ज केले होते त्यांनीच अनेकांना हाताशी धरून उपविभागीय कार्यालयात समक्ष जाऊन बनावट प्रमाणपत्र दिले आहे. 

अधिक वाचा: Ahmednagar: मिल्ट्री इंटेलिजन्स आणि पोलिसांची मोठी कारवाई; सैन्य दलातील कर्मचाऱ्याला अटक, वाचा काय आहे कारण...

असं असताना देखील संबंधितांना वाचविण्यासाठी पोलिसांच्या मदतीने अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्याचे उपविभागीय अधिकारी यांचे हेतू आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली होती. 

दरम्यान, शेख यांनी मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात केलेल्या उल्लेखाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीचा गुन्हा दाखल झाल्याने उपविभागीय कार्यालयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. म्हणूनच शेख यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणेच संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पोलीस आपला मोर्चा त्या कार्यालयाकडे कधी वळवणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी