नगर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची प्रकृती बिघडलेली असुन येत्या 30 मे पर्यंत सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केलेले आहेत इंदोरीकर महाराजांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांती वर पाठवले आहे अशा आशयाचं पत्र खुद्द निवृत्ती महाराज देशमुख यांनी प्रसिद्ध केलंय.
लवकरच बरा होऊन मी आपणा सर्वांच्या सेवेत येणार आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत असे देखील इंदोरीकर महाराजांनी सांगितले आहे .आपल्याला होणार्या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. असे प्रसिद्ध झालेल्या पत्रकात महाराजांनी सांगितला आहे.