सायकलीवरुन फिरणाऱ्या स्वाभिमानी नेत्याला शेतकऱ्यांनी दिल स्पेशल गिफ्ट, शरद मरकड आता फिरणार इनोव्हा कारमधून

नगर
उमेर सय्यद
Updated Aug 12, 2022 | 23:47 IST

एका तरुण शेतकरी नेत्याच्या धडपडीची दखल घेत अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी 28 लाखांची इनोव्हा कार भेट दिली आहे. तो शेतकरी नेता आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रत्येक लढ्यात सायकलवरून सहभागी झाला आहे. शरद मरकड असं या शेतकरी नेत्याचं नाव आहे.

Farmers gave a special gift to the self-respecting leader who travels on a bicycle, Sharad Markad will now travel in an Innova car
सायकलीवरुन फिरणारा स्वाभिमानी नेत्याला शेतकऱ्यांनी दिल स्पेशल गिफ्ट, शरद मरकड आता फिरणार इनोव्हा कारमधून   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • युवा शेतकरी नेत्याला इनोव्हा कार भेट
  • स्थानिक शेतकऱ्यांनी देणगी जमा करून भेटवस्तू दिल्या
  • सायकल चालवणाऱ्या शेतकरी नेत्याने ही भेट अनमोल असल्याचे सांगितले

अहमदनगर : एखाद्या नेत्यावर जनतेचे मनापासून प्रेम असले की काय होऊ शकते, याचा प्रत्यय सध्या अहमदनगर जिल्ह्यात येत आहे. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते शरद मरकड यांच्याबाबत दाखवलेला दिलदारपणा सध्या चर्चेचा विषय आहे. शरद मरकड हे गेली अनेक वर्षे अहमदनगर परिसरात शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. येथील जनतेमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. याच प्रेमापोटी लोकांनी शरद मरकड यांना वर्गणी काढून अलिशान कार भेट दिली आहे. (Farmers gave a special gift to the self-respecting leader who travels on a bicycle, Sharad Markad will now travel in an Innova car)

अधिक वाचा : बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी शिवसेना : केसरकर

शरद मरकड यांना जनतेने वर्गणी काढून छोटीमोठी नव्हे तर थेट टॉयोटाची अलिशान कार भेट दिली आहे. या कारची किंमत साधारण २८ लाखा रुपयांच्या घरात आहे. सध्याच्या काळात सामान्य जनता ही लोकप्रतिधींच्या नावाने कायम बोटं मोडताना, दुषणं देताना दिसते. मात्र, अशा काळात एखाद्या नेत्यावर जनतेने एवढं प्रेम करणं, हा प्रकार विरळाच म्हणावा लागेल.

कोण शरद मरकड

शरद मरकड असं या शेतकरी नेत्याचं नाव आहे. जो शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न तहसील स्तरावर व जिल्हा स्तरावर गेली ५ वर्षे सातत्याने मांडत आहे. वयाच्या 24 व्या वर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने करताना शरद पोलिस आणि सरकारविरोधात लढत आहेत. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही शरद शेतकऱ्यांसाठी सतत धडपडत राहिला. 2019 मध्ये शरद महाराष्ट्रातील मोठे शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या संपर्कात आले आणि राजू शेट्टींसोबत त्यांनी पायी पदयात्रा काढली. त्यानंतर शरदचे काम पाहून राजू शेट्टी यांनी त्यांना पाथर्डी तहसीलच्या शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केले.

अधिक वाचा : Gram Panchayat Election: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; १८ सप्टेंबरला मतदान, पाहा संपूर्ण वेळापत्रक

शेतकऱ्यांच्या प्रत्येक लढ्यासाठी सरकार आणि अधिकाऱ्यांना विनंती करण्यासाठी शरद मरकड गेली ५ वर्षे सायकल चालवत राहिले. आपल्या प्रश्नांबाबत ते ठिय्या आंदोलन करत राहिले. शरदच्या कार्याने प्रभावित होऊन अहमद नगर जिल्ह्यातील पार्थडी तालुक्यातील शेतकर्‍यांनी देणगी गोळा करून त्यांना २८ लाखांची इनोव्हा कार भेट दिली.

अधिक वाचा : शिंदे गटाचं ठरलं! मुंबईत करुन दाखवणार अन् दादरमध्ये प्रति सेना भवन उभारुन दाखवणार 

अमूल्य भेट 

शरद मरकड सांगतात की, शेतकर्‍यांचा कोणताही प्रश्‍न शासन आणि प्रशासनासमोर मांडण्यास मी कधीच मागेपुढे पाहिले नाही आणि आज जेव्हा शेतकर्‍यांनी त्यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या कमाईतून जमवलेल्या पैशातून ही गाडी आपल्या एका शेतकरी मुलाला भेट दिली आहे, ती अमूल्य आहे. शेतकऱ्यांचा मी ऋणी आहेच, पण आयुष्यभर त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात ते कायम राहतील आणि त्यांच्यासाठी लढत राहतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी