आरोग्यमंत्र्यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - दरेकर

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 13, 2021 | 21:18 IST

File a case of culpable homicide against the Health Minister - Darekar अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या दुर्घटनेसाठी आरोग्यमंत्र्यांना जबाबदार धरुन त्यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा - दरेकर

File a case of culpable homicide against the Health Minister - Darekar
आरोग्यमंत्र्यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - दरेकर 
थोडं पण कामाचं
  • आरोग्यमंत्र्यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - दरेकर
  • आजही नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु सेंटर चालू नाही
  • नगर जिल्हा रुग्णालयात फायर ऑडिट न करणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? - दरेकर

File a case of culpable homicide against the Health Minister - Darekar नगर: अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या दुर्घटनेमध्ये ज्या परिचारिकांनी रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले त्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर तसेच डॉक्टर व कंत्राटी कर्मचा-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पण फायर ऑडिट न करणारे जे जबाबदार अधिकारी, इलेक्ट्रीकल विभागाचे मुख्य अभियंता यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरोधात गुन्हा का नोंद नाही असा सवाल करतानाच या दुर्घटनेसाठी आरोग्यमंत्र्यांना जबाबदार धरुन त्यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

अहमदनगर रुग्णालयाच्या आग प्रकरणात दोषींवर कारवाई

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU ला आग, ११ ठार

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील आगीमध्ये ११ निष्पाप रुग्णांचा दुदैर्वी मृत्यू झाला होता. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज या रुग्णालयाची भेट घेतली. तसेच तेथील डॉक्टर व परिचारिकांशी चर्चा केली. त्यानंतर आयोजिच पत्रकार परिषदेत बोलता दरेकर यांनी सांगितले की,  एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे मला येथे यायला थोडा उशिर झाला. झालेली घटना नक्कीच दुदैर्वी असून या दुर्घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. कुठल्यातरी डॉक्टर व परिचारिकांवर गुन्हा दाखल करायाचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायचा आणि जनतेचा असंतोष शांत करण्यासाठी कोणाचा तरी बळी द्यायचा ही सरकराची आता पध्दत झाली आहे. भंडा-याच्या घटनेतही अनेक जीव आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यावेळी येथे तातडीने फायर ऑडिट करुन घेऊ. फायर सिस्टिम बसविण्यात येईल असे सरकारने सांगितले. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता सरकार घेईल असे आश्वासनही सरकारच्यावतीने देण्यात आले. त्यानंतर परभणी, नाशिक,वसई, भांडुपच्या मॉलच्या घटना घडली, त्यामुळे केवळ बोलाची कडी बोलाचा भात अश्या प्रकारची सरकारची वक्तव्ये आहेत अशी टीकाही दरेकर यांनी केली.

आजही नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु सेंटर चालू नाही. पहिल्या मजल्यावरील आयुसीयु सेंटरसुध्दा सध्या बंद अवस्थेत आहे. असा हा सरकारचा भोंगळ कारभार सुरु असून यासाठी बेफिकीर सरकार व प्रशासन जबाबदार आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यात घडलेल्या आगीच्या विविध दुर्घटनेत शेकडो निष्पापांचे बळी गेल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

या दुर्घटनेचा एफआयर दाखल करतानाच केवळ परिचारिका व डॉक्टर, कंत्राटी कर्मचारी यांनाच जबाबदार का धरण्यात आले. ज्या अधिका-यांनी फायर ऑडिट केले नाही. ज्या अधिका-यांनी ही यंत्रणा सक्षमपणे सुरु ठेवण्यास अकार्यक्षम ठरले त्यांच्याविरोधात एफआयर का दाखल करण्यात आला नाही असा सवाल करतानाच हा विषय आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात येईल व या विषयाची सखोल चौकशीची मागणी करण्यात येईल. तसेच पोलिसांचाही या प्रकरणात कोणाला वाचविण्याचा प्रयत्न आहे का याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जनवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

भंडाराच्या दुर्घटनेतही फायर ऑडिट झाले नव्हते व तेथेही कर्मचा-यांना दोषी ठरविण्यात आले. फायर ऑडिटची जबाबदारी कोणी घेतली नाही. फायर ऑडिटरच्या अहवालानुसार, ३३७ रुग्णालयांचे अंदाजपत्रक व प्रस्ताव सरकारला पाठविले होते. पण या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही वा कुठलेही काम सुरु करण्यात आले नाही. भंडाराच्या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरु केली असली तर राज्यातील विविध अशा घटनांमध्ये आपल्याला १०० हून अधिक मृत्यु रोखता आले असते व नगरची दुर्घटनाही रोखता आली असती. अशी खंत दरेकर यांनी व्यक्त केली. 

आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारची वन विंडो सिस्टिम निर्माण करायला हवी. तसेच रुग्णालयाच्या अग्निशमन यंत्रणेच्या प्रस्तावांना मान्यता देऊन ते प्रस्ताव लवकरात मंजूर होणे आवश्यक आहे. डीपीडीसीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाले पण अद्याही निधी उपलब्ध झालेला नाही. अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे ज्या फाईलवर तत्परतेने सही झाली पाहिजे आहे, त्या फाईल्स तरी तुंबवून ठेऊ नका. लाल फितीमध्ये या फाईल अडकायला नको अशी व्यवस्था करण्याची गरज आहे, तसेच आयुसीयु युनिट लवकरात लवकर सुरु करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी