Fire at ahmadnagar civil hospital अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU ला आग, ११ ठार

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 06, 2021 | 16:52 IST

Fire at ahmadnagar civil hospital 11 dead अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (Intensive Care Unit - ICU / अतिदक्षता विभाग) विभागाला आग लागली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

Fire at ahmadnagar civil hospital
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU ला आग, ११ ठार  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU ला आग, ११ ठार
  • आगीचे कारण अद्याप समजलेले नाही
  • आग प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करू - हसन मुश्रीफ

Fire at ahmadnagar civil hospital 11 dead । अहमदनगर: महाराष्ट्रात हॉस्पिटलला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ताजी घटना महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (Intensive Care Unit - ICU / अतिदक्षता विभाग) विभागाला आग लागली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

आग लागली त्यावेळी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (Intensive Care Unit - ICU / अतिदक्षता विभाग) विभागात १७ रुग्ण होते; अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. आगीत आयसीयू (Intensive Care Unit - ICU / अतिदक्षता विभाग) विभागाच्या एसीचे प्रचंड नुकसान झाले.

मृत्यू झालेल्यांपैकी किती जणांचा होरपळून मृत्यू झाला आणि किती जणांचा गुदमरून मृत्यू झाला याची नेमकी आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. आग विझवण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे काही रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आग प्रकरणाची तसेच त्यामुळे झालेल्या हानीची सखोल चौकशी केली जाणार आहे. मृतांच्या परिवारांना मदत केली जाईल, असे आश्वासन स्थानिक प्रशासनाने दिले.

घटनास्थळाला अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ भेट देणार आहेत. आग प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करू आणि मृतांच्या नातलगांना आवश्यक ती मदत देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यातील घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले. ही अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना असल्याचे ते म्हणाले. आग प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी तसेच या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यात सर्वत्र ठोस उपाय करावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

मृतांच्या जवळच्या नातलगांना पाच लाखांची भरपाई

दुर्घटनेतील मृतांच्या जवळच्या नातलगांना पाच लाखांची भरपाई दिला जाईल. तसेच आग प्रकरणात अहमदनगरचे डीसी चौकशी करतील आणि एका आठवड्यात अहवाल सादर करतील, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

एनडीआरएफच्या निधीतून दोन लाखांची मदत

राज्य शासनाच्या पाच लाखांच्या भरपाई व्यतिरिक्त मृतांच्या जवळच्या नातलगांना एनडीआरएफच्या निधीतून दोन लाखांची मदत दिली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी