माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला पुन्हा बेड्या ; पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमेंची कारवाई 

नगर
उमेर सय्यद
Updated Sep 15, 2021 | 18:19 IST

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा  अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम पुन्हा गोत्यात सापडला आहे.

Former Deputy Mayor Shripad Chhindam Bedya again arrested by Deputy Superintendent of Police Vishal Dhume
माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला पुन्हा बेड्या 
थोडं पण कामाचं
  • छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा  अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम पुन्हा गोत्यात सापडला आहे.
  • अट्रोसिटिसारख्या गुन्ह्यांत उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांनी श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना अटक केली आहे.
  • गेल्या दोन महिन्यापूर्वी अहमदनगर येथील एका टपरीचालकास छिंदम बंधूनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा  अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम पुन्हा गोत्यात सापडला आहे. अट्रोसिटिसारख्या गुन्ह्यांत उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे आणि त्यांच्या पथकाने श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना अटक केली आहे. (Former Deputy Mayor Shripad Chhindam Bedya again arrested)

गेल्या दोन महिन्यापूर्वी अहमदनगर येथील एका टपरीचालकास छिंदम बंधूनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच संबधिताची टपरी जीसेबीच्या सहाय्याने उखडून त्याची जागा बळकावल्याचा देखील आरोप या बंधूवर आहे. 

दरम्यान छिंदम बंधूवर गेल्या दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते दोन महिन्यापासून फरार होते. काल मंगलवारी हे आरोपी बंधू शहरातील दिल्लीगेट परिसरात असल्याची बातमी मिळताच पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकातील हेमंत खंडागळे, सुयोग सुपेकर, किरण बनसोड, सागर द्वारके यांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे. 

छिंदम बंधू मधील श्रीपाद छिंदम याने काही महिन्यांपूर्वी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने त्याला उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर त्याला अटकही करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी