Ahmadnagar Hospital fire : पोलिसांच्या अहवालावर डॉक्टर पोखरणा यांच्या अटकपूर्व जामिनाचे भवितव्य ! 

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 16, 2021 | 16:47 IST

निलंबित असलेले डॉक्टर पोखरणा यांना न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यत अंतरिम अटकपूर्व जामीन दिला असून पोलिसांचे म्हणणे देखील १७ नोव्हेंबरला मांडण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. 

Future of pre-arrest bail of Dr. Pokhrana on police report!
पोलिसांच्या अहवालावर डॉक्टर पोखरणा यांचे भवितव्य   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सिव्हिल सर्जन डॉक्टर सुनील पोखरणा यांची आज तोफखाना पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासमोर चौकशी करण्यात आली आहे.
  • डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या अटकपूर्व जामिनाचे भवितव्य पोलिसांच्या अहवालावर अवलंबून राहणार आहे ! 
  • अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड ICU वार्डला ६ नोव्हेंबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती.

अहमदनगर : जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी निलंबित असलेले जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुनील पोखरणा यांची आज तोफखाना पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासमोर चौकशी करण्यात आली आहे. (Future of pre-arrest bail of Dr. Pokhrana depend on police report!)

दरम्यान निलंबित असलेले डॉक्टर पोखरणा यांना न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यत अंतरिम अटकपूर्व जामीन दिला असून पोलिसांचे म्हणणे देखील १७ नोव्हेंबरला मांडण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. 

त्यामुळे १७ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामिनावर असलेल्या डॉक्टर सुनील पोखरणा यांची आज १६ नोव्हेंबर रोजी चौकशी करण्यात आल्याने उद्या १७ नोव्हेंबर रोजी पोलिस न्यायालयात काय म्हणणे मांडणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून आता डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या अटकपूर्व जामिनाचे भवितव्य पोलिसांच्या अहवालावर अवलंबून राहणार आहे ! 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड ICU वार्डला ६ नोव्हेंबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्या आगीत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकऱणाची महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आदेश दिले असले तरी दुसरीकडे पोलिसांनी देखील या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन जणांना  अटक केली होती , सध्या अटकेत असलेले चार जणांना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून त्यांच्या जामिनावर देखील उद्या सुनावणी ठेवण्यात येणारं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी