Shirdi: महाराष्ट्र ATS आणि नगर पोलिसांची मोठी कारवाई, शिर्डीत लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

नगर
उमेर सय्यद
Updated Aug 20, 2022 | 16:33 IST

Big action of Maharashtra ATS: महाराष्ट्र एटीएसने एक मोठी कारवाई केली आहे. शिर्डीतून एका संशयिताला अटक केली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र एटीएस, अहमदनगर पोलिसांची मोठी कारवाई 
  • शिर्डीतून संशयित दहशतवाद्याला अटक 
  • अटक करण्यात आलेल्याला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले 

Maharashtra ATS arrest one suspect terrorist: महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथक (ATS), अहमदनगर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी एकत्रित मिळून एक मोठी कारवाई केली आहे. शिर्डीतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राजिंदर असे असून तो पंजाबमधील असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्याला महाराष्ट्र एटीएसने पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. (Maharashtra ATS Ahmednagar and Punjab police arrest suspected terrorist from shirdi maharashtra read in marathi)

पंजाब पोलिसांच्या गाडीला स्फोटके लावून उडवून देण्याच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. नाशिक एटीएस विभागाचे अधिकारी, अहमदनगर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी एकत्रित मिळून ही कारवाई केली आहे.

बॉम्बने उडवण्याचा रचलेला कट 

पंजाबमधील अमृतसरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनात आयईडी (IED) स्फोटके लावून त्यांना ठार करण्याचा कट रचण्यात आला होता. गाडी धुण्यासाठी आलेल्या मुलाने वेळीच हे स्फोटक पाहिले आमि त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पोलिसांच्या बॉम्ब निकामी पथकाने ती स्फोटके नष्ट केली.

अधिक वाचा : हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आढळली AK-47, काडतुसं असलेल्या बोट; महाराष्ट्र ATS प्रमुखांकडून बोटीची पाहणी

अमृतसरमधील रणजीत एवेन्यू परिसरात पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दिलबाग सिंग यांचे घर आहे. दिलबाग यांची खासगी गाडी त्यांच्या घराबाहेर उभी होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी घराबाहेर गाडी उभी केली होती. सकाळी ही गाडी धुण्यासाठी मुलगा आला असता त्याला काही संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यानंतर त्याने या बाबतची माहिती दिलबाग यांना दिली. दिलबाग यांनी पाहिल्यावर ती बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती बीडीडीएस टीमला दिली.

या घटनेची माहिती मिळताच बीडीडीएस टीमने घटनास्थळी पोहोचत तो बॉम्ब निकामी केला. ती एक IED स्फोटके होती. असं म्हटलं जात आहे की, कार स्टार्ट करताच बॉम्बचा स्फोट झाला असता आणि तशा प्रकारे ते सेट करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी