"महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेस फुटीच्या मार्गावर"; पुन्हा राजकीय भूकंप होणार? भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

नगर
सुनिल देसले
Updated Jul 22, 2022 | 17:06 IST

Maharashtra Politics news: एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या इतर आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. त्याचीच आता पुनरावृत्ती होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Maharashtra both congress parties on verge of split may arise political earthquake in state again
"महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेस फुटीच्या मार्गावर"; पुन्हा राजकीय भूकंप होणार? 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? 
  • राज्यातील दोन्ही काँग्रेस पक्ष फुटीच्या मार्गावर, भाजप नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Congress and NCP on verge of split: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाले. या राजकीय भूकंपातून अद्याप अनेकजण सावरलेले सुद्धा नाहीयेत. त्यातच आता भाजप नेत्याने केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार की काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेस पक्ष हे फुटीच्या मार्गावर असल्याचं विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. (Maharashtra both congress parties on verge of split may arise a political earthquake in state again)

राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं, मला वाटतं की महाराष्ट्राचा विचार केला तर दोन्ही काँग्रेस हे फुटीच्या मार्गावरच आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक हे त्याचं एक निमित्त आहे. काँग्रेसला तर स्वत:च्या अस्तित्वासाठीच आता आंदोलन करावं लागेल.

राज्यात राजकीय भूकंप? 

महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं आणि या बंडखोरीत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार सहभागी झाले. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या गटाला अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिला. या बंडखोरीमुळे राजकीय भूकंप आला आणि ठाकरे सरकार पडलं. त्यानंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस यांनी मिळून सत्ता स्थापन केली. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी दावा केला होता की, काँग्रेस आणि राष्ट्र्रवादीत अनेकजण नाराज असल्याचा दावा केला होता. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विधानानुसार दोन्ही काँग्रेसमध्ये फूट पडली तर पुन्हा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : भिवंडीत लगेचच बदलली निष्ठा, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांची मोठी गर्दी, पण पाठ फिरताच...

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने अहमदनगरमध्ये सेवा सप्ताहाच आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संगमनेर तालुक्यात मोफत सर्व रोग निदान आणि उपचार शिबिराच आयोजन केल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. संगमनेरमधील ग्रामीण रुग्णालयात यावेळी रुग्णांना मोफत फळे वाटपही करण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी नव्यानं उभारणाऱ्या 100 बेडच्या हॉस्पिटलची पाहणी केली. त्याचबरोबर कोविड लसीकरण बूस्टर डोसच वितरणही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. 

अधिक वाचा : Viral Video: चित्रा वाघ, तुम्ही उद्या ब्ल्यू फिल्म टाकून त्याचंही उत्तर मागाल: रुपाली पाटील-ठोंबरे

सेवा सप्ताहमध्ये सर्व रुग्णांना विविध आजारावर मोफत उपचार, प्रवार ग्रामीण रुग्णालय लोणी येथे करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या मोफत सर्व रोग निदान आणि उपचार शिबिर संपन्न झाला. दिनांक 22 जुलै ते 29 जुलै या काळात हे शिबिर पार पडणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी