Ahmednagar Politics: नगरमधील ऐतिहासिक उड्डाणपूल अन् अहमदनगरचं राजकारण...

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 21, 2022 | 16:27 IST

Ahmednagar news: नव्या उड्डाणपुलावरून देखील अहमदनगर शहरामध्ये राजकारण पहायला मिळाले. वास्तविक पाहता अहमदनगर शहरात उड्डाणपूल होणे गरजेचेच होते. तशी मागणीही अनेक वर्षांपासून शहरातील सर्वच पक्षातील नेतेमंडळी आणि नगरकर करत होते.

Maharashtra british era bridge in ahmednagar and politics over this bridge read in marathi
Ahmednagar Politics: नगरमधील ऐतिहासिक उड्डाणपूल अन् अहमदनगरचं राजकारण... 

Ahmednagar Politics: अहमदनगर शहरामध्ये इंग्रजांनी एक छोटा का होईना परंतू लोखंडी पुल बांधला होता. त्यानंतर तब्बल 100 वर्षांनंतर आणि नगरकरांच्या 17 वर्षाच्या प्रदीर्घ मागणी अन् संघर्षानंतर शहरामध्ये 331 कोटी रुपये खर्च करून 3 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झाला.

सुरू झालेल्या या नव्या उड्डाणपुलावरून देखील अहमदनगर शहरामध्ये राजकारण पहायला मिळाले. वास्तविक पाहता अहमदनगर शहरात उड्डाणपूल होणे गरजेचेच होते. तशी मागणीही अनेक वर्षांपासून शहरातील सर्वच पक्षातील नेतेमंडळी आणि नगरकर करत होते. शहरात होणारी वाहतूक कोंडी, जड वाहनांमुळे होणारे अपघात त्यामुळे उड्डाणपुलाच्या मागणीसाठी आंदोलने देखील करण्यात आले.

हे पण वाचा : चर्चेतील सनबर्न फेस्टिवल मुंबई-पुण्यात कधी, काय आहे तिकीट दर?​

माजी खासदार, माजी आमदार यांनी देखील उड्डाणपुलासाठी अथक प्रयत्न केले. अन् अखेरीस भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी अथक प्रयत्न आणि परिश्रम करून नगरकरांच्या स्वप्नात येणाऱ्या उड्डाणपुलाला सत्यात उतरवले.

सुरवातीला या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात येताच पुलाच्या नामांतरवरून राजकारण झाले. शहरातील एक ना अनेक संघटना, वेगवेगळे पक्ष यांनी आपापल्या पद्धतीने उड्डाणपूलाच नामांतर केलं. त्यानंतर समोर आली ती म्हणजे उड्डाणपुलाच्या श्रेयवादाची लढाई.... यात देखील उड्डाणपूल नेमकं कोणामुळे झाला यावरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

हे पण वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

परंतु जितके सरळ हे अहमदनगर नाव आहे तितकं सरळ इथलं राजकारण नाही हे विशेष.... त्याला कारणं म्हणजे उड्डाणपूल तयार झाल्यानंतर रस्ते व वाहतूक मंत्री यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन होणारं हे जाहिर होताच काही संघटना आणि पक्षांनी उड्डाणपुलावर जाऊन नारळ फोडण्याचाच प्रयत्न केला. परंतु ज्या उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून एवढे नाट्य रूपांतर केले त्यांनी जर शहरातल्या खराब रस्त्यांसाठी प्रयत्न केले असते तर... कदाचित हाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडला आहे.

वास्तविक पाहता उड्डाणपुलाच्या जमीन हस्तांतरासाठी लागणाऱ्या खर्चातून अहमदनगर महानगरपालिकेने 30 टक्के खर्च नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून कराव्या अशा सूचना महाराष्ट्र शासनाने दिल्या होत्या. मात्र अहमदनगर महापालिकेच्या आर्थिक अडचणींमुळे हस्तांतरासाठी लागणारा सर्व खर्च हा शासनाने केला होता. असं असतांना देखील 100 वर्षानंतर शहरात होणाऱ्या उड्डाणपुलाच अनं त्याच्या कामाच कौतुक न करता फक्त वाभाडे काढण्यात येत आहे हे विशेष.

हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

खरंतर मोठं मोठे महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग हे काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत होतात आणि शहरात उड्डाणपूलाच झालेल काम हे विकसित शहराकडे वाटचाल करणारा आहे. असं असतांना देखील उड्डाणपुलाच्या नावावर अहमदनगर शहरात हार तुऱ्यासाठी देखील राजकारणात चढाओढ लागली आहे हे नवलच! 

खरंतर अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या या उड्डाणपुलाच्या कामाची सुरवात डिसेंबर 2018 साली सुरू झाली असती मात्र या उड्डाणपुलासाठी सर्वात महत्त्वाची बाबा होती ती म्हणजे संरक्षण खात्याची जमीन हस्तांतरित करणे. त्यामुळे खासदार विखे पाटील यांनी एक ना अनेक केंद्रीय नेत्यांशी बैठका करून संरक्षण खात्याची जमीन देखील हस्तांतरित करून घेतली होती. मग सुरू झालं उड्डाणपूल उभारणीच काम....

मात्र असं असलं तरी 100 वर्षानंतर नगरकरांना लाभलेल्या या उड्डाणपुलावरून झालेले राजकारण हे शहरातील खराब रस्त्यांसाठी केले तर येणाऱ्या निवडणुकीत जनतेसाठी केलेल्या कामाची जनताच पावती देईल हे मात्र नक्की.

हे पण वाचा : जेवणाच्या ताटात 3 चपात्या का देऊ नये?

उड्डाणपूलसक्कर चौक ते चांदणी चौक अंतर - 3.080 किलोमीटर 

भूसंपादन - 10.30 हेक्टर

खर्च - 258.30 कोटी 

चौपदरी पिलर - 83 

रॅम्प - 2 

सेगमेंट - 931 

आय गिडर - 150 

राबलेले कामगार- 600 

कामाचे महिने - 22

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी