ahmednagar nilwande sarpanch post election result: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आले आहेत. या निवडणुकीत प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या सासू शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली आहे. (Maharashtra Gram Panchayat Election result Indorikar maharaj mother in law shashikala pawar wins sarpanch post in ahmednagar nilwande read in marathi)
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणुकीत इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या उमेदवार होत्या. महसूल मंत्री विखेपाटील यांचे समर्थक असलेले इंदूरीकर महाराज यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
हे पण वाचा : Pune: वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी पुण्याजवळील प्रसिद्ध ठिकाणे
या निवडणुकीत शशिकला पवार यांनी सुशिला उत्तम पवार यांचा पराभव केला आहे. शशिकला पवार यांनी 227 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अपक्ष निवडणूक लढलेल्या शशिकला पवार आता कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात यावरुन विविध चर्चा रंगत आहेत. आता शशिकला पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती कशी झोपते? तुमची रास कोणती?
राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. राज्यातील अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
हे पण वाचा : Chanakya Niti: या मुलींसोबत लग्न केल्यावर मुलांचे रातोरात नशीब उजळते
या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (20 डिसेंबर 2022) सकाळपासून सुरू झाली. या निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंतच्या कलानुसार, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचं दिसून येत आहे.