H3N2 suspected and covid positive patient died in ahmednagar: कोरोनाची लाट ओसरल्यानतंर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र, असे असतानाच आता इन्फ्लूएंझा H3N2 ने चिंता वाढवली आहे. एन्फ्लूएंझा बाधितांची संख्या देशातील विविध राज्यात वाढत आहे कर्नाटक आणि हरियाणात असे दोन बाधितांचे मृत्यूही आतापर्यंत झाले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात इन्फ्लूएंझा H3N2 बाधित एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अहमदनगर येथील एका 23 वर्षीय तरुणाला एन्फ्लूएंझा H3N2 ची लागण झाली होती आणि त्यातच त्याला कोरोनाचाही संसर्ग झाला होता. या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाहीये. अहमदनगरमधील तरुणाचा मृत्यू इन्फ्लूएंझामुळे की कोरोनामुळे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.
हे पण वाचा : हे 2 पदार्थ वापरा अन् मासिक पाळीच्या वेदना पळवा
मृतक तरुण हा वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाच्या मृत्यू नंतर आता त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे शोधण्यात येत आहे. यासाठी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा तरुण काही दिवसांपूर्वी फिरायला गेला होता आणि तेथून आल्यावर त्याला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळली होती अशी माहिती सुद्धा समोर आली आहे.