लोकायुक्त कायदा करा नाही तर सत्तेतून पायउतार व्हा : अण्णा हजारे

नगर
रोहन जुवेकर
Updated May 15, 2022 | 23:48 IST

Make Lokayukta Law Demand Anna Hazare : लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पण अद्याप लोकायुक्त कायदा झालेला नाही. सरकारला अडीच वर्ष होत आली तरी ही परिस्थिती आहे. आता लोकायुक्त कायदा करा नाही तर सत्तेतून पायउतार व्हा, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.

Make Lokayukta Law Demand Anna Hazare
लोकायुक्त कायदा करा नाही तर सत्तेतून पायउतार व्हा : अण्णा हजारे 
थोडं पण कामाचं
  • लोकायुक्त कायदा करा नाही तर सत्तेतून पायउतार व्हा : अण्णा हजारे
  • लोकायुक्त कायदा केला नाही तर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन सुरू करणार
  • दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आम आदमी पक्षाकडे मुख्यमंत्री पद आहे पण लोकायुक्त कायदा केलेला नाही

Make Lokayukta Law Demand Anna Hazare : राळेगणसिद्धी : लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पण अद्याप लोकायुक्त कायदा झालेला नाही. सरकारला अडीच वर्ष होत आली तरी ही परिस्थिती आहे. आता लोकायुक्त कायदा करा नाही तर सत्तेतून पायउतार व्हा, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.

लोकायुक्त कायदा केला नाही तर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन सुरू करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले. ठाकरे सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर सात बैठका झाल्या. पण पुढे काहीच झाले नाही. कायदा करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. निव्वळ वेळ घालविण्याचा प्रकार सुरू आहे. हाच प्रकार अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पण करत आहे.

दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आम आदमी पक्षाकडे मुख्यमंत्री पद आहे. पण या दोन्ही राज्यांमध्ये राज्य सरकारने लोकायुक्त कायदा केलेला नाही. आम आदमी पक्षाच्या या वर्तनाचे दुःख वाटते, असेही अण्णा हजारे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी