Ahmednagar: मिल्ट्री इंटेलिजन्स आणि पोलिसांची मोठी कारवाई; सैन्य दलातील कर्मचाऱ्याला अटक, वाचा काय आहे कारण...

नगर
उमेर सय्यद
Updated Oct 04, 2022 | 21:03 IST

Maharashtra News: अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे येथील सदन कमांड मिल्ट्री इंटेलिजन्स आणी कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लष्करातील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

Military intelligence arrest one man for making forged documents on name of military in ahmednagar crime news
मिल्ट्री इंटेलिजन्स आणि पोलिसांची मोठी कारवाई; सैन्य दलातील कर्मचाऱ्याला अटक, वाचा काय आहे कारण... 

Ahmednagar Crime News: बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी अहमदनगर (Ahmednagar) स्टेशन हेडक्वॉर्टरच्या नावाने बनावट सही शिक्यासह दाखले तयार करुन महसूल उपविभागीय कार्यालयाची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पुणे (Pune) येथील सदन कमांड मिल्ट्री इंटेलिजन्स आणि कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) संयुक्त कारवाई करत लष्करातील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

अहमदनगर शहरातील लष्कराच्या हद्दीतील मालमत्तेवर बांधकाम परवानगीसाठी लष्कराच्या हेडक्वार्टरचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. मात्र महसूलच्या उपविभागीय कार्यालयात काही लष्कराचे दाखले हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते.

चक्क लष्कराकडून देण्यात येणारे ना हरकत दाखलेच बनावट असल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दाखल गुन्ह्याचा तपास मोठ्या शिताफीने करत अहमदनगर मधील लष्कराच्या एका विभागातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हे पण वाचा : तोंड असं गोड कराल तर होतील मोठे फायदे

अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नावं राजेंद्र देसराज सिंग ठाकूर असे असून कोतवाली पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान घडलेल्या या बनावट दाखले प्रकरणी मोठी साखळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याप्रमाणे तपास करण्यात येत आहे.

हे पण वाचा : वॉटर फास्टिंग - वेटलॉसचा नवा प्रकार

दरम्यान दाखल गुन्ह्यात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे, सलीम शेख, अभय कदम, सुमीत गवळी, बंडू भागवत, रवींद्र टकले, अतुल काजळे, दीपक बोरूडे, यांच्यासह सदन कमांड मिल्ट्री इंटेलिजन्स पुणे यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी