अहमदनगरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त; कोतवाली गुन्हेशाखेची कारवाई

नगर
उमेर सय्यद
Updated Feb 16, 2022 | 20:39 IST

कोतवाली गुन्हे शाखेच्या पथकाने आज संध्याकाळी ७ च्या सुमारास लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. दरम्यान सध्या पोलिसांची कारवाई सुरू असून हा गुटखा १ कोटीचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Millions of Rupees gutkha seized in Ahmednagar; Kotwali Crime branch action
अहमदनगरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त; कोतवाली गुन्हेशाखेची कारवाई  |  फोटो सौजन्य: Times Now

अहमदनगर : कोतवाली गुन्हे शाखेच्या पथकाने आज संध्याकाळी ७ च्या सुमारास लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. दरम्यान सध्या पोलिसांची कारवाई सुरू असून हा गुटखा १ कोटीचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कोतवाली पोलिसांनीं एका आरोपीला अटक केली होती दरम्यान आरोपीची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर अहमदनगर शहराच्या MIDC भागात एका गोडाऊनमध्ये आणखीन गुटखा असल्याची कबुली आरोपीने दिली. 

आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने MIDC येथील गोडाऊनवर छापा टाकून लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई सध्या सुरू असून जप्त केलेला गुटखा हा 1 कोटीचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी