Breaking! पीएवर गोळीबार झाल्यानंतर मंत्री गडाख यांच्यासह पुत्राला जिवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

नगर
भरत जाधव
Updated Apr 24, 2022 | 13:12 IST

राज्याचे जलसंधारण मंत्री (Water Resources) शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहाय्यक (PA) राजळे(Rajale ) यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता मंत्री गडाख यांच्यासह त्यांच्या पुत्राला जीवे मारण्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

Minister Gadakh threatened to kill his son
मंत्री गडाख यांच्यासह पुत्राला जिवे मारण्याची धमकी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राजळे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
  • राजळे हे लोहगाव येथे येताच अज्ञात आरोपींनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
  • जलसंधारण मंत्र्यांसह त्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी

मुंबई : राज्याचे जलसंधारण मंत्री (Water Resources) शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहाय्यक (PA) राजळे(Rajale ) यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता मंत्री गडाख यांच्यासह त्यांच्या पुत्राला जीवे मारण्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे.

नुकताच गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. सध्या राजळे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान तालुक्यातील लोहगाव या गावात ही घटना घडली आहे. राजळे हे लोहगाव येथे येताच अज्ञात आरोपींनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात हल्ल्यात राजळे यांच्या कमरेखाली एक व डाव्या पायाला एक गोळी लागली तर डाव्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे. राजळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  

हा राजळे यांच्यावर झालेला हल्ला नसून, तो माझ्यावर झालेला हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली आहे. घोडेगाव येथे रात्री राजळे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेत राजळे हे जखमी झाले आहेत. अचानक गोळीबार झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हा हल्ला का करण्यात आला, त्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.  दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या राजळे यांच्यावर अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना आता पुण्याला हलवण्यात आले आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी