अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरीकरांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी नुकताच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. (Mother-in-law of Kirtankar Indurikar joins BJP)
अधिक वाचा : साहेब मला माफ करा...; शिवाजी पार्कमध्ये झळकलेल्या बॅनरची चर्चा
शशिकला पवार या संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावात नवनियुक्त सरपंच आहेत. त्या काही दिवसांपूर्वी अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर काॅंग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गटाने दावा केला होता की ते आमच्या गटात आहे, मात्र आज स्वतः शशिकला पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
अधिक वाचा : कांदिवलीच्या बिल्डरचे पैसे चोरुन पळालेल्याला अटक, 27 लाखांची रोकड आणि बाईक जप्त
पक्षप्रवेशानंतर शशिकला पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. गावाचा विकास करायचा असेल तर भाजपात जावे लागेल म्हणून मी भाजपात प्रवेश केला असल्याचे पवार यांनी सांगितले
अधिक वाचा : Beed Farmer Issues धुक्याच्या छायेने बुडवली स्वप्नं, शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान
निळवंडे गाव हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात येतं. यामुळे शशिकला पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने थोरात यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ३७ पैकी २५ ग्रामपंचायतीत थोरात गटाने सत्ता मिळवली. तर काही ग्रामपंचायती विखे पाटील गटाने ताब्यात घेतल्या. आता निळवंडेच्या सरपंच शशिकला पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निळवंडे ग्रामपंचायतीतही विखे पाटीलकडे आली आहे.