MSRTC strike: अहमदनगरमध्ये प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसेसवरती अज्ञात ईसमाकडून दगडफेक

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 27, 2021 | 17:30 IST

MSRTC strike: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Road Transport Corporation) अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी (ST workers) शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला होता

unknown person  throws stones at a passenger bus
अहमदनगरमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या बसेसवर दगडफेक   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त नव्हता.
  • बसेसवर अज्ञाताकडून दगडफेक
  • दगडफेक सारखे प्रकार घडत असल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. 

MSRTC strike: अहमदनगर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Road Transport Corporation) अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी (ST workers) शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला होता. दरम्यान शुक्रवारी पैठण, शनिवारी सकाळी अहमदनगर (Ahmednagar) व श्रीरामपूर (Shrirampur) कडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसेसवर अज्ञात ईसमाकडून दगडफेक करण्यात आली असून या प्रकारामुळे कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता, मात्र शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही. शेवगावकडून अहमदनगरकडे जाणारी बस क्रमांक एमएच ४० वाय ५४२८ या गाडीवर अज्ञात इसमाने तालुक्यातील अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली आहे. श्रीरामपुरकडे जाणारी बस क्रमांक एमएच ४० एन ८८९५ वर सौंदळा ( भेंडा नेवासा), तसेच शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या एमएम ४० एम ८७५२ या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे.

यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान एसटी सुरु झाल्याने प्रवाशी व विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत असून संप मागे घेत एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत मात्र विविध ठिकाणी दगडफेक सारखे प्रकार घडत असल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फुट पडल्याचे दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर कर्माचाऱ्यांची अंतरिम पगारवाढ करण्यात आली. पगारवाढीनंतर कामावर परतण्याचे आवाहन परिवहन मंत्र्यांकडून करण्यात आले. परंतु काही आंदोलनकर्ते मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसल्याने राज्यातील बहुतेक ठिकाणी संप अजून चालू आहे. तर काही ठिकाणी बस धावू लागल्या आहेत. परंतु काही ठिकाणी बसेसवर दगडफेक केली जात आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी