अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा आणखी वाढला, आता 'इतके' बाधित

नगर
उमेर सय्यद
Updated Jun 04, 2020 | 20:49 IST

सकाळी नगर शहर, शेवगाव, पारनेर, संगमनेर येथे ६ तर संध्याकाळी पुन्हा नगर शहर, राहाता, पाथर्डी आणि संगमनेर येथील एकूण १२ नव्याने रुग्ण आढळून आले आहेत.

corona_update
फोटो सौजन्य: iStockImages (प्रातिनिधीक फोटो)  

थोडं पण कामाचं

  • अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतोय कोरोनाचा आकडा 
  • आज दिवसभरात आढळले १८ रुग्ण 
  • जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९५ रुग्णांची नोंद

अहमदनगर: अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांचा आकडा वाढत असून आज दिवसभरात शहरासह जिल्ह्यात १८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा एकूण आकडा १९५ वर पोहोचला आहे.

आज सकाळी नगर शहर, शेवगाव, पारनेर, संगमनेर येथे ६ तर संध्याकाळी पुन्हा नगर शहर, राहाता, पाथर्डी आणि संगमनेर येथील एकूण १२ नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी दिवसभरात एकूण १८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बहुतांश रुग्ण हे मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून येत असून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील व्यक्ती देखील कोरोना बाधित होत असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे नगर शहरासह नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल द्वेदी यांच्या आदेशानुसार नगर शहरातील मध्यभागी असलेला काही भाग तर संगमनेर शहरातील काही भाग हा १७ जूनपर्यंत हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्याची सद्द स्थिती पाहता जिल्ह्यात एकूण १९५ कोरोना बाधीत रुग्ण असून त्यापैकी ९० रुग्णांना दवाखान्यातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ९४ रुग्ण सध्या अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील स्थिती काय?

राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी