वादानंतर वैतागले इंदुरीकर महाराज, कीर्तन सोडून करणार हे काम

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले

nivrutti maharaj indurikar kirtan about sex talk react on his kirtan
वादानंतर वैतागले इंदुरीकर महाराज, कीर्तन सोडून करणार हे काम  |  फोटो सौजन्य: Times Now

शिर्डी : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर याबाबत मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवण्यात आली. याच प्रमाणे इंदुरीकर महाराजांची शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे, यामुळे ते पुन्हा एकदा वादात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. शिर्डी येथे याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून थेट शेती करेन,’ असे उद्विग्न होऊ इंदुरीकर महाराज यांनी निर्वाणीचा इशाराच दिला आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो..आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचा, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली,’ असे वैतागून इंदुरीकर महाराज म्हणाले.

दरम्यान, ‘यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. यू ट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही,’ असं  विश्वास इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केला आहे. 
  
  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी