शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानने (shirdi saibaba sansthan trust) नवा आदेश (order) जारी केला आहे. मंदिर परिसरात फ्लेक्स बोर्ड लावून भक्तांना सूचना करण्यात आली आहे की, समाधीचे दर्शन घेण्यासाठी भारतीय संस्कृतीनुसार (indian culture) वेशभूषा (dress) करावी. असा निर्णय साई संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे साईबाबा मंदिर (Sai baba Temple) गेल्या ८ महिन्यापासून बंद होते. दरम्यान दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने मंदिरे उघडण्यासाचा निर्णय घेतल्यानंतर साई संस्थानने ही विनंती वजा सूचना भक्तांसाठी दिली आहे.
साई संस्थानच्या या निर्णयाचे साई भक्तांनी देखील स्वागत केले आहे. 'मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून जाणे ही भारतीय संस्कृती नाही, महिला किंवा युवतींनी तोकडे कपडे मंदिरात घालून आल्यास भक्त देवाकडे कमी आणि त्या महिलांकडे जास्त बघतात. त्यामुळे महिलांनी भारतीय संस्कृतीचं पालन करणं हे तिचे कर्तव्य आहे.' अशी प्रतिक्रिया काही महिला भक्तांनी दिल्या आहेत.
'संस्थानने घेतलेला हा निर्णय फक्त मंदिरातच नव्हे तर मस्जिद, गुरुद्वारा, चर्चेमध्ये देखील लागू करण्यात यावा जेणेकरून भारतीय संस्कृती जोपासली जाईल आणि येणाऱ्या नवीन पीढीमध्ये देखील सभ्यता टिकून राहिल.' अशी देखील प्रतिक्रिया महिला भक्तांकडून देण्यात आल्या आहेत.
आता या निर्णयाबाबत प्रत्येक स्तरातून नेमक्या कशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
दरम्यान, मंदिर परिसरात हिंदी, इंग्रजी व मराठीमधून भक्तांनां विनंती वजा सूचना देण्यात आली आहे. की आपण पवित्र स्थळी प्रवेश करत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी. करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करूनच दर्शन सुरू आहे. ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे. तसेच पालखी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्याचे टाळावे. असे आवाहन साईभक्तांना साईबाबा संस्थानच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.