अहमदनगर : अहमदनगर स्थानीक गुन्हे शाखतील पोलिसांनी सापळा रचून अटक केलेल्या आरोपीकडून तब्बल १७ दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अहमदनगर शहरात दाखला असलेल्या गुन्ह्यासंदर्भात तपास करत असतांना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नगर - औरंगाबाद रोड येथे सापळा रचून शेख अकिल आणी शेख अनिस या आरोपींना पोलिसांनी अटक केली.
अधिक वाचा : आदित्य यांच्या बदनामी करण्यात राणेंचा मोठा वाटा : केसरकर
अटक केलेल्या आरोपीकड़े अधिक तपास केला असता या आरोपींनी आणखीन त्यांच्या साथीदारांचे नावं सांगितले होते दरम्यान स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उर्वरित दोन आरोपी नामे मुकररम शेख आणी आयूब शेख या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल १७ दुचाकी गाड्या हस्तगत केल्या आहे.
अधिक वाचा : 'जोकर'च्या सिक्वेलमध्ये लेडी गागा साकारणार भूमिका
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत अटकेत असलेल्या चारही आरोपींवर अहमदनगर आणी औरंगाबाद येथे १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती यावेळी देण्यात आली आहे.