Sujay Vikhe Patil : अहमदनगर: पॉर्नोग्राफिमुळे मुली सुरक्षित नाहीत असं मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतच पत्रकारांसमोर मांडलं. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत बद्दल बोलताना त्यांनी इंटरनेटच्या अनिर्बंध वापराला अधोरेखित केलं. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मोबाईल आणि सोशल मीडियावर अश्लीलतेच्या साधनांची जी सहज एक्सेसेब्लिटी आली आहे ती अत्यंत धोकादायक आहे. या पूर्वी तशा साधनांची एक्सेसेब्लिटी नसल्यामुळे त्या वेळेची पिढी चांगल्या प्रकारे वाढली. आजची पिढी त्यांना हव तेव्हा हवे ते इंटरनेटवर पाहू शकते. त्यामुळे रस्त्यावर चालण्यासाठी मुली असुरक्षित झाल्या आहेत, यासाठी आम्ही कायदा आणू असेही पाटील म्हणाले.
अधिक वाचाः Sujay Vikhe Patil का करतायत अहिल्यादेवींच्या नावाला विरोध?