Ahmadnagar Fire Case : पोखरणाच्या जामिनावरची सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता; पोलिसांनी मागितली मुदतवाढ ! 

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 17, 2021 | 14:04 IST

Ahmadnagar District Hopital Fire Case : जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी निलंबित असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी होणारं होती. पण पोलिसांनी मुदतवाढ मागितली आहे.

Possibility to postpone hearing on interim pre-arrest bail of suspended District Surgeon Pokhran Extension sought by police!
पोखरणाच्या जामीन अर्जाची सुनावणी पुढे ढकण्याची शक्यता 
थोडं पण कामाचं
  • जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी निलंबित असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी होणारं होती.
  • पोलिसांनी मुदतवाढ मागितल्याने डॉक्टर पोखरणाच्या जामिनावरची सुनावणी आता पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 
  • जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी पोलिसांनी एका वैद्यकीय अधिकारीसह तीन जणांना अटक केली होती.

Ahmadnagar District Hopital Fire Case ।  अहमदनगर :  जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी निलंबित असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी होणारं होती. मात्र पोलिसांनी मुदतवाढ मागितल्याने डॉक्टर पोखरणाच्या जामिनावरची सुनावणी आता पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता आहे.  (Possibility to postpone hearing on interim pre-arrest bail of suspended District Surgeon Pokhran Extension sought by police!)

जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी पोलिसांनी एका वैद्यकीय अधिकारीसह तीन जणांना अटक केली होती. दरम्यान या प्रकरणी निलंबित असलेले डॉक्टर सुनील पोखरणा यांनी कोर्टाकडून १७ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मिळविला होता. 

दरम्यान त्यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार होती. तसेच न्यायालयाने पोलिसांना देखील आपल म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉक्टर पोखरणा यांच्या अतरिम अटकपूर्व जामीनाच भवितव्य हे पोलिसांच्या म्हणण्यावर अवलंबून होते. 

मात्र आता पोलिसांनी आपलं म्हणणं न्यायालयापुढे सादर करण्यासाठी आणखी कालावधी मागितला असल्याने आता डॉक्टर पोखरणा यांच्या अंतरींम  अटकपूर्व जामिनावर सुनावणी पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी